अनिल कांबळे
नागपूर,
decoforms extortion शहरात वाहतूक शिस्तीच्या नावाखाली ‘व्ही.आय.पी.एल. डेकाेफर्म कंपनीकडून सर्वसामान्य नागरिकांची सुरू असलेली उघड लूट आणि छळाविराेधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आक्रमक पाऊल उचलले. शहराध्यक्ष अनिल अहीरकर, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाले,कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्या नेतृत्वात शेकडाे कार्यकर्ते आणि त्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘धडक माेर्चा’ काढून प्रशासनाविराेधात एल्गार पुकारला. माेर्चानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले.
वाहतूक पाेलिसांच्या अधिकृत आदेशानुसार काेणतीही गाडी उचलण्यापूर्वी संबंधित परिसरात ध्वनिक्षेपकावरून रीतसर घाेषणा करणे बंधनकारक आहे. मात्र, कंत्राटदाराचे मजूर पूर्वसूचनेशिवाय अवघ्या काही सेकंदांत गाड्या क्रेनवर चढवतात. हा प्रकार वाहतूक शिस्त लावण्याचा नसून ’वाहन चाेरी’ सदृश असून ही गुंडगिरी आहे, असा आराेप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला. खाजगी कंत्राटदाराला प्रति-वाहन दंडावर आधारित कमिशन मिळत असल्यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष कायदेशीर अंमलबजावणीवर नसून, केवळ जास्तीत जास्त गाड्या उचलून स्वतःचे ’नफफ्याचे टार्गेट’ पूर्ण करण्यावर केंद्रित झाले आहे. नियमानुसार जर गाडी उचलत असताना वाहनचालक जागेवर हजर झाला, तर जागेवरच दंडाची पावती फाडून वाहन साेडणे बंधनकारक आहे. परंतु, कंपनीचे बाउन्सर महिला व वृद्धांशी गैरवर्तन करून जबरदस्तीने गाड्या ओढून नेतात.decoforms extortion यामुळे वाहनांचे चेसिस आणि लाॅकचे माेठे नुकसान हाेत आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी या गंभीर विषयात तातडीने हस्तक्षेप करावा. नागपूर महानगरपालिका आणि पाेलीस प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची आपल्या अध्यक्षतेखाली एक तातडीची संयुक्त बैठक बाेलवावी आणि या मनमानी कारभाराला चाप लावावा, अशी
जॅमर व्हॅनवर खासगी दलाल
वाहतूक पाेलिस लाच घेताना सापडू नये म्हणून पाेलिसांच्या प्रत्येक जॅमर व्हॅनवर एक दलाल युवक ठेवलेला असताे. कारला जॅमर लावल्यानंतर ताे दलाल दंडाची पावती ाडण्याऐवजी पैशाची मागणी करताे. लाचेच्या स्वरुपात मिळालेली रक्कम वाहतूक पाेलिसांच्या हाती न देता दलाल स्वतः ठेवून नंतर वाटणी करण्यात येते, असा आराेप हाेत आहे.