कर्मचाऱ्यांनी मागितली ‘आत्मदहनाची’ परवानगी

सीईओ मंदार पत्की यांना निवेदन

    दिनांक :20-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
mandar-patki : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा स्तरावरील कर्मचारी, तालुका स्तरावरील पाणी व स्वच्छता व्यवस्थापन सल्लागार तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटरांचे सहा महिन्यांपासून मानधन रखडल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे तत्काळ मानधन देण्यात यावे, अन्यथा आत्मदहनाची परवानगी देण्यात यावी. अशा मागणीचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की जलजीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हास्तर कर्मचाèयांचे डिसेंबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंत तालुका पाणी व स्वच्छता व्यवस्थापन सल्लागार व डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचे मानधन देण्याकरिता नोव्हेंबर 2025 ते एप्रिल 2026 पर्यंतही निधी उपलब्ध झालेला नाही.
 

y20May-Jal 
 
 
 
त्यामुळे सर्व कंत्राटी कर्मचाèयांच्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. तसेच घरातील वृद्ध व्यक्ती व लहान मुले यांच्या आजाराकरिता औषधोपचार करण्याकरितासुद्धा पैशांची अडचण निर्माण होत आहे. घरातील दैनंदिन खर्च भागविण्याकरिता तसेच मुलामुलींचे शैक्षणिक शुल्क भरण्याकरिता सावकाराकडून कर्ज काढून पूर्तता करावी लागत आहे.
 
 
या सर्व गंभीर अडचणीमुळे सर्व कंत्राटी कर्मचारी सावकारी पाशात अडकले आहे. याबाबत सविस्तर निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांना देण्यात आले आहे. यात सर्व कंत्राटी कर्मचारी वर्गावर आत्महत्या करण्याशिवाय तसेच आत्मदहन करण्याशिवाय कोणत्याही पर्याय नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
 
 
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व कंत्राटी कर्मचारी यांच्या मानधनाकरिता लागणारा निधी तत्काळ उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली असून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.