ईपीएफओकडून लवकरच व्हॉट्सॲपवर PF सेवा

बॅलन्स, क्लेम स्टेटस एका मेसेजवर उपलब्ध होणार

    दिनांक :20-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
EPFO WhatsApp PF कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कोट्यवधी सदस्यांसाठी लवकरच व्हॉट्सॲप आधारित विशेष डिजिटल सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. या नव्या सुविधेमुळे पीएफ खातेदारांना त्यांचा खातेबॅलन्स, क्लेम स्टेटस तसेच मागील पाच व्यवहारांची माहिती थेट व्हॉट्सॲप चॅटद्वारे सहज उपलब्ध होणार आहे.
 

EPFO WhatsApp PF service, 
या उपक्रमामुळे सदस्यांना ईपीएफओच्या वेबसाइट किंवा पोर्टलवर वारंवार लॉगिन करण्याची गरज राहणार नाही. फक्त मोबाईलवर व्हॉट्सॲपवर “हॅलो” असा संदेश पाठविल्यानंतर संबंधित माहिती डिजिटल स्वरूपात तत्काळ उपलब्ध करून दिली जाणार आहे. ही सेवा २४ तास उपलब्ध राहणार असल्याने वापरकर्त्यांना कोणत्याही वेळी त्यांच्या पीएफ खात्याशी संबंधित माहिती मिळवणे सुलभ होणार आहे.
 
 
अनेकदा कर्मचाऱ्यांच्या पगारातून EPFO WhatsApp PF भविष्य निर्वाह निधी कापला जातो, मात्र त्याबाबतची अद्ययावत माहिती नियमितपणे तपासली जात नाही. ही अडचण लक्षात घेऊन ईपीएफओकडून ही नवी सुविधा विकसित करण्यात आली आहे. या सेवेमध्ये केवळ बॅलन्स पाहणेच नव्हे, तर क्लेमची सद्यस्थितीही (लाइव्ह स्टेटस) ट्रॅक करता येणार आहे.ईपीएफओच्या व्हॉट्सॲप सेवेअंतर्गत वापरकर्त्याने संदेश पाठवताच प्रणाली प्रथम त्याच्या मोबाइल क्रमांकाची पडताळणी करेल. हा क्रमांक युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) शी जोडलेला आहे की नाही, याची तपासणी करून सुरक्षा प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर वापरकर्त्याच्या चॅटमध्ये पर्यायांची एक सूची उपलब्ध होईल, ज्यातून आवश्यक सेवा निवडता येणार आहे.विशेष म्हणजे ही संपूर्ण सेवा विविध प्रादेशिक भाषांमध्येही उपलब्ध करून दिली जाणार असल्याने देशभरातील सदस्यांना ती वापरणे अधिक सोपे होईल. वापरकर्त्यांना साध्या सूचनांद्वारे किंवा मेन्यूमधून आवश्यक माहिती मिळवता येईल.
 
 
या प्रणालीच्या मागे प्रगत एआय EPFO WhatsApp PF चॅटबॉट कार्यरत राहणार असून तो वापरकर्त्यांच्या विनंत्यांवर रिअल टाइममध्ये प्रक्रिया करून ईपीएफओच्या डेटाबेसमधून माहिती प्राप्त करेल आणि ती थेट व्हॉट्सॲप चॅटमध्ये पाठवेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.या नव्या डिजिटल उपक्रमामुळे ईपीएफओ सेवा अधिक जलद, सुलभ आणि वापरकर्ता-अनुकूल होणार असून कोट्यवधी सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्याची माहिती हाताच्या अंतरावर मिळणार आहे.