डायल ११२ वर खोटी माहिती देणे भोवले

    दिनांक :20-May-2026
Total Views |

Dial 112
 
 
तळेगाव (श्या.पं.), 
False Information on Dial 112 डायल ११२ वर वारंवार कॉल करून खोटी माहिती देऊन नाहक त्रास देणार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव येथील अनिल गुंजाळ हा वारंवार डायल ११२ क्रमांकावर कॉल करून खोटी माहिती देत होता. त्या आधारे तळेगाव पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत होते. परंतु, कोणतीही घटना घडली नसल्याचे समजले. त्यावरून अनिल गुंजाळ याला तळेगाव पोलिसांनी समज दिली. पोलिस माघारी फिरताच काही वेळाने पुन्हा त्याने डायल ११२ वर कॉल केला व खोटी माहिती दिली. त्यामुळे पुन्हा तळेगाव पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी सुद्धा कोणतीही घटना घडली नसल्याचे लक्षात आले. खोटी माहिती देऊन त्रास देण्यासाठी डायल ११२ वर कॉल करून पोलिसांना त्रास देतात. पोलिसांनी दारूच्या नशेत असलेला अनिल गुंजाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नागरिकांनी या सेवेचा दुरुपयोग करू नये, असे आवाहन तळेगावचे ठाणेदार मंगेश भोयर यांनी केले आहे.