चिखलीत इंधन टंचाईवर मात करण्यासाठी नगराध्यक्षांचा 'थ्री-वे फॉर्म्युला'

    दिनांक :20-May-2026
Total Views |
प्रशासनाने 'पॉझिटिव्ह' भूमिका घेण्याचे आवाहन

चिखली : Fuel Shortage: 'Three-Way Formula' शहरात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. या संकटामुळे सर्वसामान्य नागरिक, नोकरदार आणि प्रामुख्याने शेतकरी वर्ग होरपळून निघत आहे. या परिस्थितीवर तातडीने तोडगा काढण्यासाठी चिखलीचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी पुढाकार घेतला असून, शहरातील इंधन वितरणाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि व्यावहारिक 'थ्री-वे फॉर्म्युला' (त्रिस्तरीय नियोजन) सुचवला आहे. या नियोजनाची अंमलबजावणी करण्यासाठी पेट्रोल पंप चालकांसोबतच प्रशासनानेही सकारात्मक भूमिका घेऊन सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन त्यांनी केले आहे.
 
 
chikhali
 
गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी 'असे' असावे नियोजन:
नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी शहरातील पेट्रोल पंपांवर होणारी अभूतपूर्व गर्दी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न टाळण्यासाठी खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्याची मागणी केली आहे: शेतकऱ्यांसाठी एक पंप राखीव: सध्या शेतीकामांचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना डिझेलची सर्वाधिक गरज आहे. त्यामुळे शहरातील एका पेट्रोल पंपावर केवळ शेतकऱ्यांना प्राधान्याने डिझेल देण्याची व्यवस्था करावी. दुचाकी गाड्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था: शहरातील नोकरदार, व्यावसायिक आणि सर्वसामान्यांच्या दुचाकी वाहनांसाठी एक स्वतंत्र पेट्रोल पंप निश्चित करावा, जेणेकरून तिथे केवळ पेट्रोल मिळेल आणि रांगा लहान होतील. इतर वाहनांसाठी तिसरा पर्याय: चारचाकी, अवजड आणि इतर व्यावसायिक वाहनांच्या डिझेल-पेट्रोलसाठी शहरातील तिसरा पेट्रोल पंप नियुक्त करण्यात यावा.
"प्रशासनाचा 'पॉझिटिव्ह' दृष्टिकोनच संकटातून मार्ग काढेल"
Fuel Shortage: 'Three-Way Formula'  या संदर्भात बोलताना नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर विशेष भर दिला. त्यांनी सांगितले की "सध्याची इंधन टंचाई पाहता जर सर्वच पंपांवर सर्व प्रकारच्या गाड्यांची एकच गर्दी झाली, तर मोठा गोंधळ उडतो आणि गरजूंपर्यंत इंधन पोहोचत नाही. जर पेट्रोल पंप मालकांनी आपापसात समन्वय ठेवला आणि *प्रशासनाने यामध्ये तातडीने 'पॉझिटिव्ह' (सकारात्मक) भूमिका घेऊन या नियोजनात मध्यस्थी केली, तर या संकटातून सहज मार्ग निघू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी त्वरित डिझेल उपलब्ध होईल आणि शहरातील इतर वाहनधारकांनाही दिलासा मिळेल. प्रशासनाने याकडे केवळ एक समस्या म्हणून न पाहता, उपाययोजनांसाठी सकारात्मकतेने पुढे यावे."
 
 
शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची गरज
शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ किंवा शेतीची कामे इंधनाअभावी रडू नयेत, ही यामागची मुख्य भूमिका आहे. नगराध्यक्षांच्या या कल्पक आणि शिस्तबद्ध तोडग्यामुळे चिखली शहरातील इंधन टंचाईच्या काळात सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होऊ शकते. आता या आवाहनावर शहरातील पेट्रोल पंप चालक आणि स्थानिक प्रशासन किती वेगाने आणि सकारात्मकतेने पावले उचलते, याकडे संपूर्ण चिखलीकरांचे लक्ष लागले आहे