गूगल मॅपने दाखवला रस्ता, पण ट्रकने घेतला जीव!

    दिनांक :20-May-2026
Total Views |
हरिद्वार,
Truck Claimed a Life हरिद्वारमध्ये पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मार्ग शोधताना चुकीच्या रस्त्यावर गेलेल्या एका ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे नमाजासाठी मशिदीकडे निघालेल्या वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील चित्रफीत यंत्रणेत कैद झाली असून त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे.

Haridwar crime news
 
मिळालेल्या माहितीनुसार, ज्वालापूर परिसरात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. ट्रक चालक दिशा शोधण्यासाठी गूगल मॅपचा वापर करत होता. मात्र रस्ता चुकल्याने तो मुख्य महामार्ग सोडून बाजारपेठेतील अरुंद मार्गावर पोहोचला. Truck Claimed a Life त्याच वेळी अन्सारी मार्केट परिसरातील मशिदीत नमाजासाठी जाणारे सुमारे ७५ वर्षीय नूर मोहम्मद रस्त्याने पायी जात होते. दरम्यान, ट्रक चालकाने वाहन मागे घेताना मागील बाजूस चालत असलेल्या वृद्धाकडे लक्ष दिले नाही. निष्काळजीपणामुळे ट्रकचा मागील भाग त्यांच्यावर आदळला आणि ते रस्त्यावर कोसळले. त्यानंतर वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
 
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. स्थानिकांच्या मते, ट्रक वेगात होता आणि चालकाला त्या भागातील रस्त्यांची माहिती नसल्याचे दिसून येत होते. अपघातानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी अल्पावधीतच त्याला ताब्यात घेतले. तो पिलीभीत येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. Truck Claimed a Life प्राथमिक चौकशीत चालक मोबाईलवरील दिशादर्शक प्रणालीचा वापर करत असताना चुकीच्या मार्गावर गेल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित होत असून, त्यामध्ये ट्रक मागे घेताना चालकाचे दुर्लक्ष स्पष्ट दिसत आहे. या अपघातामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.