वर्धा जिल्ह्यात उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू

    दिनांक :20-May-2026
Total Views |
वर्धा, 
Heatstroke in Wardha District जिल्ह्यात सूर्य आग ओकू लागला असून पारा ४७ अंशाच्यापार गेल्याने नागरिकांच्या जिवाची काहिली होत असतानाच जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महिलेचा समावेश आहे. या घटना मंगळवार १९ रोजी घडल्या. दिलीप मडावी (५४) रा. गणेशपूर हे बहिणीच्या घरी जात असल्याचे सांगून घरून गेले होते. दरम्यान, केळझर ते दहेगाव मार्गावर त्यांचा मृतदेह आढळला. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. खरांगणा ठाण्यांतर्गत येणार्‍या डोर्ली येथील देविदास पचारे (७५) हे शेतात त्यांच्या घरच्या शेळ्या चारत असताना अति तानमानामुळे भोवळ येऊन खाली पडले. यातच त्यांचा मृत्यू झाला. आर्वी पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या सावंगी पोळ येथील बेबी निमजे (६५) ही इतर महिलांसोबत रवींद्र सलाम यांच्या पारगोठाण शिवारातील शेतात कचरा वेचण्यासाठी गेली होती. भर उन्हात शेतात काम करताना बेबी निमजे ही भोवळ येऊन खाली पडताच त्यांचा मृत्यू झाला.
 
 
District
 
 
आर्वी येथील मायबाई वार्डातील गोलू हुमे (३५) याचा उष्माघाताने मृत्यू झाला. ही घटना गुरुनानक चौक येथे मंगळवार १९ रोजी घडली. तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. धानोली (मेघे) येथील आशा वांढरे (६५) यांचा राहत्या घरी उष्माघाताने मृत्यू झाला. मुया असलेल्या आशा अविवाहित होत्या. तसेच त्या घरात एकट्याच राहत होत्या. त्यांच्या घरावर टिनपत्र्याचे छत असून घरात पंखा किंवा कुलरसारखी कोणतीही सुविधा नव्हती. अशातच तीव्र उन्हाचा फटका बसून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.