अबब...रक्ताने माखलेला मृतदेह सापडला

    दिनांक :20-May-2026
Total Views |
कोल्हापूर,
Ichalkaranji murder case वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात बुधवारी सकाळी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. थोरात चौक परिसरात एका सफाई कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
Ichalkaranji murder case
मृत व्यक्तीचे नाव विकी सुरेश अग्रवाल (रा. कामगार चाळ, सध्या शहापूर) असे असून, तो सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्याचा मृतदेह बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास थोरात चौकातील महापालिकेच्या मालकीच्या कॉम्प्लेक्स परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. तात्काळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर गावभाग पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक महेश चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. तपास अधिक सखोल करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळी पुरावे गोळा Ichalkaranji murder case करण्याचे काम सुरू आहे.प्राथमिक तपासानुसार, हा खून रात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी आणि परिसरात आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याची चर्चा आहे, मात्र पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत निष्कर्ष जाहीर केलेले नाहीत.दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे.