प्रतिबंधीत गुटख्याची अवैध वाहतूक रोखली

तळेगाव पोलिसांची कारवाई

    दिनांक :20-May-2026
Total Views |

प्रतिबंधीत
 
 
तळेगाव (श्या.पं.), 
Illegal Transport of Gutkha Intercepted राष्ट्रीय महामार्ग ६ वरून अवैधरित्या प्रतिबंधीत गुटख्याची वाहतूक करणारे वाहन तळेगाव पोलिसांनी ताब्यात घेत ४ लाख ४ हजार ७८५ रुपयांचा गुटखा जप्त केला. ही कारवाई तळेगाव पोलिसांनी केली. मिळालेल्या माहितीनुसार, पांढुर्णा (मध्यप्रदेश) येथून तळेगावमार्गे चांदुर रेल्वेला जात असताना अमरावती मार्गावर पोलिसांनी एम. एच. ०१ बी. एस. ५०८० क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित गुटखा व सुगंधीत तंबाखू मोठ्या प्रमाणात आढळून आला. पोलिसांनी कारची तपासणी केली असता त्यामध्ये बागबान, बाबा ब्लॅक तंबाखू, पान बहार, राजश्री, विमल, सुगंधी तंबाखू व गुटखा असा ४ लाख ४ हजार ७८५ रुपयांचा गुटखा व वाहन ५ लाख रुपये असा ९ लाख ४ हजार ७८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी शेख इम्रान अब्दुल मजीद रा. डांगरीपुरा चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती तसेच मोहम्मद आसिफ मोहम्मद नूर उर्फ अब्बास रा. साजीपुरात चांदुर रेल्वे जिल्हा अमरावती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगावचे ठाणेदार मंगेश भोयर, निखील काळे, अतुल अडसळ, प्रथमेश मोरे, गजानन साबळे यांनी केली.