बुलढाणा,
sakal matang community अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, या प्रमुख मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार मोर्चा काढण्यात आला. विविध गावांतील समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने परिसर घोषणांनी दणाणून गेला. शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

सकल मातंग समाजाच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण झालेच पाहिजे, मातंग समाजाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. शासनाने वंचित घटकांना न्याय देण्यासाठी तात्काळ उपवर्गीकरण लागू करावे, अशी मागणी करण्यात आली. व जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन दिले. मोर्चानंतर जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची महाराष्ट्र शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी समाजातील विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाच्या भूमिकेवर टीका करत, उपवर्गीकरणाशिवाय मागास घटकांना न्याय मिळणार नसल्याचे सांगितले. आंदोलनात समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बुलडाणा येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरण अंमलबजावणीसाठी न्याय गर्जना आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सकल मातंग समाजाच्या वतीने मातंग समाजाचे विजय अंभोरे यांनी सहभागी होऊन संबोधित केले.sakal matang community यावेळी विजयजी अंभोरे यांनी शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला.
यावेळी संताराम तायडे, सोपानराव पानपाटील, कैलास खंदारे,साहेबराव पाटोळे, निवृत्ती तांबे, श्रीकृष्ण शिंदे श्री.ओम नाटेकर, संभाजी निकाळजे दयाराम सोनोने, विजय सोनोने सौ.मंगलाताई निकाळजे अँड.डीगंबर अंभोरे, दादाराव महाले, विलास मानवतकर, बी.के.खरात, दिगंबर पाटोळे, वामन बोरसे, संजय बोदडे, अक्षय तायडे, विकी अव्हाड, संगीता निकाळजे, गजानन गायकवाड, अंजना खुपराव, यांच्यासह सकल मातंग समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.