ग्रामीण महिला उद्योजकांनी नामांकन दाखल करा

जानकीदेवी बजाज पुरस्कार

    दिनांक :20-May-2026
Total Views |
वर्धा,
Janakidevi Bajaj Award जानकीदेवी बजाज पुरस्कार २०२६ साठी ग्रामीण महिला उद्योजकांकडून नामांकने मागविण्यात येत आहेत. आयएमसी लेडिज विंगने ग्रामीण भागात उत्कृष्ट कार्य केलेल्या महिला उद्योजकांना सन्मानित करणार्‍या प्रतिष्ठित ३३ व्या जानकीदेवी बजाज पुरस्कार २०२६ साठी नामांकने मागविली आहेत. या पुरस्काराचा उद्देश ग्रामीण भारतातील महिला उद्योजकता, स्वयंरोजगार आणि सामाजिक-आर्थिक विकासाला चालना देणे हा आहे. निवडलेल्या महिला उद्योजकांना १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे अजय पाटील यांनी कळवले आहे. पुरस्कार सोहळा जानेवारी २०२७ च्या दुसर्‍या आठवड्यात मुंबईत आयोजित केला जाईल.
 
 
Janakidevi Bajaj Award
 
 
ज्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी स्वयंपूर्ण उद्योग उभारले आहेत आणि ग्रामीण समुदायांचे राहणीमान सुधारणे, रोजगार निर्मिती करणे, शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि आर्थिक संधी वाढवणे यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील गट आणि सहकारी संस्था देखील अर्ज करण्यास पात्र आहेत. संकेतस्थळावरून ऑनलाइन नामांकने देखील सादर करता येतील. अर्जामध्ये उपक्रमाचे वर्णन, त्याचा प्रभाव, आर्थिक स्थिती, मागील पुरस्कारांची माहिती आणि संबंधित कागदपत्रे समाविष्ट असणे आवश्यक आहे. नामांकने सादर करण्याची अंतिम मुदत ३० सप्टेंबर २०२६ आहे.