वादातून मोठा उद्रेक! दगडफेक, पोलीस ठाण्यावर हल्ला

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पुणे,
Kondhwa violence पुण्यातील कोंढवा परिसरात लहान मुलांमधील किरकोळ वादाने मोठे वळण घेत हिंसक स्वरूप धारण केले. सुरुवातीला साधा वाटणारा वाद पुढे दोन मोठ्या गटांमधील संघर्षात रूपांतरित झाला आणि काही वेळातच संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन लहान मुलांमध्ये झालेल्या किरकोळ भांडणातून सुरुवात झालेला वाद स्थानिक नागरिकांच्या मध्यस्थीनंतर शांत होईल असे वाटत होते. मात्र, काही वेळातच दोन्ही बाजूंची मोठी मंडळी या प्रकरणात उतरली आणि परिस्थिती चिघळली. त्यानंतर दोन्ही गटांतील शेकडो लोक रस्त्यावर उतरले आणि एकमेकांवर विटा-दगडांचा मारा सुरू झाला.
 

Kondhwa violence, Pune clash news, 
रात्री उशिरा परिस्थिती अधिक गंभीर झाली, जेव्हा सुमारे १५० ते २०० जणांचा जमाव कोंढवा पोलीस ठाण्याच्या परिसरात जमला. या जमावातील काही घटकांनी पोलीस ठाण्याच्या इमारतीवर तसेच आशीर्वाद चौक आणि एका सोसायटीच्या दिशेने दगडफेक केल्याचे समोर आले आहे. या घटनेत काही पोलीस कर्मचारी आणि नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.दरम्यान, दुसऱ्या एका तक्रारीनुसार १५ ते १८ जणांच्या गटाने एका निवासी सोसायटीत घुसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा करत, दगडफेक करून रहिवाशांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याचेही आरोप करण्यात आले आहेत.घटनेनंतर पुणे पोलिसांनी तातडीने अतिरिक्त Kondhwa violence कुमक मागवून परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून परिसरात शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.पोलिसांनी या प्रकरणात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून शेकडो जणांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.