संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी सुसंस्कार शिबिरांची गरज- आ. बडोले

कोकणा येथील सुसंस्कार शिबीराची सांगता

    दिनांक :20-May-2026
Total Views |
सडक अर्जुनी, 
Konkan Character-Building Camp तालुक्यातील कोकणा/जमी येथे आयोजित श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोपीय कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले प्रमुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या ११ दिवसीय सुसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना शिस्त, नैतिक मूल्ये, राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती आणि व्यक्तिमत्व विकास यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आ. बडोले म्हणाले की, आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर चांगले संस्कार आणि नैतिक मूल्यांची जाणीव असणे अत्यंत आवश्यक आहे. राष्ट्रसंतांनी समाजाला सर्व धर्म समभाव, मानवता, बंधुभाव आणि सामाजिक ऐक्याची शिकवण दिली. त्यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक विचार, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे ही काळाची गरज आहे.
 
 
kokna
 
 
अशा सुसंस्कार शिबिरांमुळे विद्यार्थ्यांना जीवन जगण्याची योग्य दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता चांगले नागरिक आणि चांगले माणूस बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. तसेच भविष्यात राष्ट्रसंतांच्या विचारांना अभिप्रेत असे सर्वधर्मीय, व्यापक आणि संस्कारप्रधान शिबिर मोठ्या प्रमाणावर आयोजित व्हावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, शिवाजी गहाणे, सपना नाईक, खेमराज भेंडारकर, शिला भेंडारकर, अमरदीप रोकडे, मधुसुदन दोनोडे, राधेश्याम झोळे, मुक्ताबाई हत्तिमारे, पूजा दीक्षित, एकनाथ किरसान, ईश्वर कोरे, नरेश पटोले, समीर कोरे, योगेश मेंढे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, विद्यार्थी-विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
...