वकिल आणि मद्यधुंद पोलिसांमध्ये न्यायालय परिसरात राडा

बाईक हटवण्यावरून वाद पेटला

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मुंबई
lawyer-police clash कल्याण न्यायालय परिसरात पार्क केलेली दुचाकी हटवण्याच्या कारणावरून वकिल आणि मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार वाद होऊन धक्काबुक्की झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
 

lawyer-police clash  
न्यायालय परिसरात एका बाजूला उभी असलेली दुचाकी हटवण्यावरून वादाची ठिणगी पडली. यावेळी संबंधित पोलिस कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप वकिलांकडून करण्यात आला आहे. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला आणि त्यानंतर परिस्थिती चिघळून दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्की झाल्याचे सांगण्यात येते.घटनेनंतर परिसरातील इतर वकील आणि पोलिस कर्मचारी घटनास्थळी जमा झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. काही वेळासाठी न्यायालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकारामुळे न्यायालयासारख्या lawyer-police clash  संवेदनशील ठिकाणी पोलिसांच्या वर्तनावर आणि शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून दखल घेण्यात आली असून घटनेचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे.या घटनेमुळे वकील संघटनेतही तीव्र नाराजी व्यक्त होत असून दोषी पोलिस कर्मचाऱ्यावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.