डॉ. मेधा कुलकर्णी यांची संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पुणे
Megha Kulkarni राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांची विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल या विषयांशी संबंधित संसदीय स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांची या समितीच्या सदस्यपदीही निवड झाली असून ही नियुक्ती १८ मे २०२६ पासून प्रभावी झाली आहे.
 

Megha Kulkarni, Parliamentary Standing Committee India 
राज्यसभा सचिवालयाचे संयुक्त सचिव राकेश नैथानी यांनी डॉ. कुलकर्णी यांच्या नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान केले. या समितीमार्फत विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील धोरणे, पर्यावरण संरक्षण, वनसंवर्धन तसेच हवामान बदलाशी संबंधित विधेयके आणि महत्त्वपूर्ण विषयांचा सखोल अभ्यास करून संसदेपुढे शिफारसी सादर केल्या जातात.भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि पुण्याच्या माजी आमदार असलेल्या डॉ. कुलकर्णी यांनी संसदीय कामकाजात उल्लेखनीय योगदान दिले असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यापूर्वी संसदरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले की, या जबाबदारीमुळे देशातील वैज्ञानिक प्रगती, पर्यावरण संवर्धन आणि हवामान बदलासंदर्भातील धोरणात्मक चर्चेत अधिक प्रभावी योगदान देण्याची संधी मिळणार आहे. विज्ञान-तंत्रज्ञानातील वेगवान बदल आणि पर्यावरणीय आव्हानांचा अभ्यास करून योग्य दिशादर्शक भूमिका Megha Kulkarni  बजावण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी नमूद केले.या नियुक्तीमुळे संसदीय पातळीवर पर्यावरण आणि विज्ञानविषयक चर्चेला नवे बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.