नवी दिल्ली,
Meta मेटाने पुन्हा एकदा कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू केली आहे. यावेळी, कंपनीचा दृष्टिकोन थोडा वेगळा आणि आश्चर्यकारक होता. कर्मचाऱ्यांना आधी घरून काम करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानंतर पहाटे नोकरीतून कमी केल्याचे ईमेल पाठवले. मेटाने अशाप्रकारे सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
मेटाने अमेरिका आणि यूकेसह जगभरातील आपल्या कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना मंगळवारी अचानक घरून काम करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामागे कंपनीचा कार्यालयाच्या कॉरिडॉरमध्ये कोणताही गोंधळ, आवाज किंवा विरोध टाळणे, हा स्पष्ट उद्देश होता.. कर्मचारी घरी असतानाच अचानक नोकरी कपातीचे ईमेल धडकले. मेटा आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी अंदाजे 10 टक्के, म्हणजेच सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे.
जागतिक स्तरावर अशाच प्रकारे सूचना
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, ही प्रक्रिया त्यांच्या सिंगापूर कार्यालयात सुरू झाली. प्रभावित कर्मचाèयांना स्थानिक वेळेनुसार पहाटे 4:00 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 1:30 वाजता) नोकरी समाप्तीचे ईमेल मिळाले. कंपनी आता त्यांच्या वेगवेगळ्या टाइम झोननुसार, जागतिक स्तरावर अशाच प्रकारे सूचना पाठवत आहे मेटा कंपनीमधील या मोठ्या बदलामागील मुख्य कारण म्हणजे कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्सला (एआय) दिलेले नवीन प्राधान्य. ज्या कंपनीत पूर्वी अंदाजे 78,000 कर्मचारी होते, ती केवळ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत नाही, तर इतर हजारो कर्मचाèयांच्या भूमिकांमध्येही बदल करत आहे. मेटाच्या चीफ पीपल ऑफिसर जेनेल गेल यांनी एका अंतर्गत मेमोमध्ये म्हटले आहे की, कंपनी आता नवीन-नेटिव्ह टीम्स विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, 7,000 कर्मचाèयांना या नवीन टीम्समध्ये हस्तांतरित केले जाईल.