देशव्यापी केमिस्ट बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :20-May-2026
Total Views |
कारंजा लाड, 
Nationwide chemist closure अखिल भारतीय औषधी विक्रेता संघ तसेच महाराष्ट्र राज्य केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या वतीने ऑनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी केमिस्ट बंदला कारंजा तालुयासह जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग दिला. यावेळी कारंजा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन च्या वतीने तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे निर्माण होणारे धोके, औषध वितरणातील नियम व त्याचा सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम याबाबत सविस्तर माहिती तहसीलदारांना देण्यात आली. यानंतर तहसील कार्यालयाच्या आवारात तालुका अध्यक्ष आशिष बंड यांनी उपस्थित केमिस्ट बांधवांना मार्गदर्शन करत काही महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, ऑनलाईन औषधांची सहज उपलब्धता ही भविष्यात गंभीर समस्या निर्माण करू शकते. यामुळे डॉटरांच्या चिठ्ठी शिवाय तसेच फार्मसिस्टच्या मार्गदर्शनशिवाय अक्षेपहार्य औषधी उपलब्ध होत आहेत.
 
 

Nationwide chemist closure 
 
 
त्यामुळे लोकांचे आरोग्य धोयात येत आहे. तसेच हा बंद रुग्णांना त्रास देण्यासाठी नसून शासनाचे लक्ष या गंभीर विषयाकडे वेधण्यासाठी करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तातडीच्या रुग्णांसाठी आवश्यक औषध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉटर्स मंडळी सुद्धा आवश्यक रुग्णांना आज आपल्याकडील सॅम्पल औषधे देतील अशी सूचना सुद्धा केमिस्ट असो कडून देण्यात आली. या आंदोलनात तालुका अध्यक्ष आशिष बंड, नवनीत डांगुर, उत्कर्ष राऊळ, विनोद तापडिया, उमेश भुतडा, शिवदास बांडे, प्रमोद देशमुख, अमोल थोरात, नितीन उपाध्ये, उमेश भोयर, राजू मोटवानी इरफान मिर्झा, सलीम मिर्झा, गुड्डू अकबानी, जगन्नाथ बंगाले, अनूप जोहरापूरकर, प्रसन्ना जोहरापूरकर, आनंद तिवारी यांच्यासह तालुयातील अनेक केमिस्ट पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.हा देशव्यापी बंद अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे,सचिव अनिलनावंदर तसेच वाशीम जिल्हाध्यक्ष राजेश पाटील शिरसाट यांचे मार्गदर्शनाखाली पुकारण्यात आला.