अनिल कांबळे
नागपूर,
strangled to death लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांनंतरच हुंडा लाेभी कुटुंबीयांनी नवविवाहितेचा गळा आवळून खून केला. तिचा प्रकृती बिघडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव केला. पाेलिसांनी शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पती आणि दीराविरुद्ध हुंडाबळी व खुनाचा गुन्हा दाखल करत दाेघांना अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, माेमिनपुरा परिसरातील बाेरियापुरा येथे राहणारा माेहम्मद जुबेर याचा 26 जानेवारी 2026 राेजी अमरावती येथील साैदागरपुरा भागातील फाजिला हिच्यासाेबत मुस्लिम रितीरिवाजानुसार निकाह झाला हाेता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू असल्याचा आराेप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. 15 मे राेजी रात्री 11च्या सुमारास माेहम्मद जुबेर याने फाजिलाची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगत तिच्या कुटुंबियांना नागपुरातील रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. दुसऱ्या दिवशी अमरावतीहून नागपुरात पाेहाेचलेल्या नातेवाईकांना फाजिलाचा मृतदेह देण्यात आला. त्यानंतर कुटुंबियांनी अमरावती येथे तिच्यावर दफनविधी केला. दरम्यान, दफनविधीपूर्वी शेवटचे स्नान घालत असताना फाजिलाच्या गळ्याभाेवती वळ दिसून आल्याने कुटुंबीयांचा संशय बळावला.strangled to death तिच्या भावाने नागपूर गाठत तहसील पाेलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत पाेलिसांनी अमरावती पाेलिसांच्या मदतीने पुरलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा आवळल्यामुळे श्वास राेखला जाऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तहसील पाेलिसांनी पती माेहम्मद जुबेर आणि त्याचा माेठा भाऊ इरान जुबेर या दाेच्याविरुद्ध हुंडाबळी व खुनाचा गुन्हा दाखल केला. पाेलिसांनी दाेघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.