पाकिस्तान हवाई दलाचे प्रशिक्षण विमान कोसळले

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मियानवाली,
Pak Air Force training aircraft crashes पाकिस्तानमध्ये हवाई दलाशी संबंधित एक मोठी दुर्घटना घडली असून मियानवाली परिसराजवळ एक लढाऊ प्रशिक्षण विमान कोसळले आहे. प्राथमिक माहितीनुसार हे विमान चिनी बनावटीचे हाँगडू जेएल-८  प्रशिक्षण जेट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उड्डाणादरम्यान अचानक तांत्रिक बिघाड किंवा इतर कारणांमुळे विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि ते जमिनीवर कोसळले. मात्र सुदैवाने विमानातील दोन्ही वैमानिकांनी प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यश मिळवले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
 
 
Pak Air Force
 
घटनेनंतर परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन बचाव पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. पाकिस्तान हवाई दलाकडून अद्याप या अपघाताबाबत अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आलेले नाही. अपघाताचे नेमके कारण काय होते, हे स्पष्ट होण्यासाठी तपास सुरू असून चौकशीनंतरच संपूर्ण वास्तव समोर येणार आहे.