लग्नात नाचण्याच्या वादातून हत्या, एक गंभीर

    दिनांक :20-May-2026
Total Views |
परतवाडा शहरातील घटना
 
अचलपूर, 
Paratwada: Murder at a Wedding परतवाडा शहरातील वाघामाता परिसरात आयोजीत लग्नाच्या वरातीत नाचण्याच्या शुल्लक कारणावरून वाद झाला असता नवरदेवाकडील दोघांना दहा जणांच्या टोळक्याने चाकू, लाठीकाठीने जबर मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यात एकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. माहितीनुसार परतवाडा शहरातील बावरी कुटुंबाने वाघामाता मंदिर परिसरात लग्नाच्या आयोजन केल होते.
 
 
murder dksl
 (संग्रहित छायाचित्र )
 
 
Paratwada: Murder at a Wedding  यावेळी वराकडील मंडळींचा नाचण्याच्या कारणावरून स्थानिकांशी शुल्लक कारणावरून वाद झाला. त्यावेळी उपस्थीत नागरिकांनी वाद मिटविला. मात्र, लग्न आटोपल्यानंतर रात्रीच्या वेळेला नवरदेवाकडील मंडळी परत जात असताना बेलज फाटा चांदूर बाजार रोड येथे त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. अमनसिंग बावरी, कालुसिगं बावरी, विरुसिंग बावरी, अजयसिंग बावरी, धरमसिंग बावरी, कुलदीपसिंग बावरी, बिजलसिं बावरी, नानकसिंग बावरी, अभयसिंग बावरी सर्व राहणार लालपूल परतवाडा व कनील जांभेकर रा. अंजनगाव स्टॉप झोपडपट्टी परतवाडा अशा दहा आरोपींनी हा हल्ला केला. या दहा जणांनी राजेंद्रसिंग बावरी (३२ वर्ष रा. आठवडी बाजार मोर्शी) व अशोकसिंह बावरी (वय. ३६ रा . मोर्शी) यांची दुचाकी अडवून खाली पाडले. चाकू व लाठीने गंभीर जखमी केले. जखमींना तात्काळ चांदूर बाजार रुग्णालयात भरती केले असता त्यात राजेंद्रसिंग बावरी याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ गंभीर जखमी असून त्याचेवर उपचार सुरू आहे. मृतकाच्या पत्नीच्या जबानी वरून परतवाडा ठाण्यात गुन्हा दाखल करूण आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास परतवाडा पोलिस करत आहे.