महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी

पोलिसांकडून आरोपी ताब्यात

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पिंपरी
Ravi Landge पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या ‘समाधान हेल्पलाईन’वर फोन करून ही धमकी देण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
 

Ravi Landge 
मिळालेल्या माहितीनुसार, आशिष जमदाडे-पाटील असे फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव असून, त्याने काही महिन्यांपूर्वी क्रीडा विषयक कामानिमित्त महापौर रवी लांडगे यांची दोन वेळा भेट घेतल्याचे समोर आले आहे. मात्र, त्यानंतर अचानक फोनवरून थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली.या घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. भोसरी पोलिस ठाण्यात त्याची चौकशी करण्यात आली असता तो मानसिक तणावाखाली असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. त्यानंतर त्याला समज देऊन सोडण्यात आल्याचेही समोर आले आहे.
दरम्यान, लोकप्रतिनिधींना Ravi Landge  थेट धमक्या मिळण्याच्या प्रकारामुळे शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत अधिक तपास सुरू केला असून, धमकीमागील नेमका उद्देश आणि परिस्थिती याबाबत सविस्तर चौकशी केली जात आहे.या घटनेमुळे प्रशासनात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्पर कारवाईनंतर परिस्थिती नियंत्रणात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.