बँक खात्यात केव्हा येणार 2000 रुपये?

    दिनांक :20-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
PM Kisan Samman Nidhi Yojana देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची ठरू शकणारी अपडेट म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या आगामी हप्त्याबाबतची चर्चा. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात (DBT) जमा केले जातात.
 

PM Kisan Samman Nidhi Yojana  
मिळालेल्या माहितीनुसार, 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील गुवाहाटी दौऱ्यात योजनेचा 22 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. त्या वेळी देशभरातील सुमारे 9.3 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला होता.आता या योजनेच्या 23 व्या हप्त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, तो जून अखेर किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
 
 
योजनेच्या नियमानुसार PM Kisan Samman Nidhi Yojana  शेतकऱ्यांना वर्षातून तीन टप्प्यांत रक्कम दिली जाते. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै, दुसरा ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा डिसेंबर ते मार्च या कालावधीत जमा होतो. या वेळापत्रकानुसार पुढील हप्त्याची प्रतीक्षा सध्या सुरू आहे.दरम्यान, लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी, आधार-बँक खाते लिंकिंग आणि जमीन पडताळणी ही प्रक्रिया पूर्ण असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. ही प्रक्रिया अपूर्ण असल्यास लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास अडथळा येऊ शकतो. शेतकऱ्यांना त्यांची लाभार्थी स्थिती तपासण्यासाठी अधिकृत पोर्टलचा वापर करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.दरम्यान, काही तांत्रिक अडचणी किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे पात्र लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यात विलंब होऊ नये यासाठी सरकारकडून वेळोवेळी तपासणी व पडताळणी प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे पुढील हप्त्याबाबतची अंतिम तारीख अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होणार आहे.