अनिल कांबळे
नागपूर,
psi third star राज्यातील पाेलिस उपनिरीक्षकांच्या रखडलेल्या पदाेन्नतीला अखेर मुर्हुत मिळाला. गृहमंत्रालयाच्या ‘ग्रीन सिग्नल’नंतर पाेलिस महासंचालकांनी राज्यातील 488 पाेलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पदाेन्नतीची यादी जाहीर केली. त्यामुळे पाेलिस उपनिरीक्षकांच्या खांद्यावर आता तिसरा ‘स्टार’ लागणार आहे.
राज्य पाेलिस दलात पाेलिस उपनिरीक्षक, सहायक पाेलिस निरीक्षक, पाेलिस निरीक्षकांच्या पदाेन्नत्या रखडल्या हाेत्या. त्यामुळे पाेलिस दलात काही महिन्यांपासून पाेलिस अधिकाèयांमध्ये नाराजीचा सूर हाेता. अनेक अधिकाèयांचे कामातील गांभीर्य हरवले हाेते. अनेक पाेलिस उपनिरीक्षकांना आज-उद्या पदाेन्नती हाेईल आणि शहरातून बदली हाेईल, अशी आशा हाेती. मात्र, पदाेन्नत्याची यादी जाहीर हाेत नसल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले हाेते. मात्र, मंगळवारी सायंकाळी राज्य पाेलिस दलातील तब्बल 488 पाेलिस उपनिरीक्षकांच्या पदाेन्नतीची यादी जाहीर झाली. त्यामुळे पाेलिस अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. या पदाेन्नतीमुळे पाेलिस अधिकाऱ्यांच्या खांद्यावर ‘एक स्टार’ वाढून ‘तीन स्टार’ लागणार आहे. पदाेन्नती मिळाल्यामुळे पाेलिस दलात अधिकारी वर्गांत आनंदी-आनंद झाला आहे. प्रत्येक अधिकारी आता नव्याने पाेस्टींग मिळालेल्या ठिकाणी रुजू हाेऊन नवी इनिंग सुरु करणार आहे.
अधिकाऱ्यांची 1250 रिक्त पदे
राज्य पाेलिस दलात सहायक पाेलिस निरीक्षकांची जवळपास 1250वर पदे रिक्त आहेत. त्यापैकी आता 488 नव्याने सहायक निरीक्षकांची भर पडली आहे.psi third star मात्र, या पदाेन्नतीमुळे सध्या उपलब्ध पाेलिस उपनिरीक्षकांवर कामाचा ताण वाढला आहे. कारण नव्याने पाेलिस उपनिरीक्षक भरती घेण्यात येणार नाही. परंतु, 2013च्या परीक्षेत उत्तीर्ण हवालदारांना पीएसआय पदावर पदाेन्नती दिल्यास ही समस्या सुटू शकते.
......
मुलांच्या शाळा आणि पाठीवर बिऱ्हाड
जूनच्या शेवटच्या आठवड्यात मुलांच्या शाळा सुरु हाेणार आहेत, त्यामुळे पदाेन्नती झालेल्या अधिकाèयांना मुलांच्या शाळांचे प्रवेशाचा प्रश्न साेडविणे साेपे हाेणार आहे. तसेच नव्या शहरात जाऊन घर आणि जुन्या घरातून सामान शिफफ्टींगसाठी वेळ मिळाला आहे. याचप्रमाणे सर्वसामान्य बदल्या (जीटी) वेळेवर व्हावी, अशी अपेक्षा पाेलिस अधिकाèयांनी केली आहे.