पावसाची लागणार 'प्रिंजेटी' उकाड्यापासून 'ब्रेक'

हवामानात "या" तारखेपासून मोठा बदल

    दिनांक :20-May-2026
Total Views |
पुणे,
Pune weather गेल्या काही दिवसांपासून कडक उन्हामुळे आणि असह्य उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या पुणेकरांना अखेर काहीसा दिलासा मिळू लागला आहे. शहरातील तापमानात घट होत असून हवामानात बदलाची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुण्यात लवकरच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज वर्तवला आहे.
 

Pune weather  
पुण्यात कमाल तापमानात अचानक तीन अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली आणि तापमान ३७ अंशांवर आले. दिवसभर कडक ऊन असले तरी सायंकाळी वातावरणात अचानक बदल झाला आणि आकाशात ढगांची दाटी झाली. या बदलामुळे रात्रीच्या वेळी उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० आणि २१ मे रोजी तापमानात किरकोळ वाढ होऊन ते सुमारे ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. मात्र २२ मेपासून हवामानात मोठा बदल अपेक्षित असून दुपारनंतर आकाश ढगाळ राहणार आहे. त्यानंतर शहरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट होण्याचा अंदाज असून कमाल तापमान सुमारे ३७ अंशांवर तर किमान Pune weather  तापमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. त्यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती काळजी घेणे फायदेशीर ठरणार आहे.