यावर्षी पाऊस कमी पडेल, पण उत्पादन जास्त होईल : पंजाब डख

आर्णीत शेतकऱ्यांशी संवाद आणि मार्गदर्शन

    दिनांक :20-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
punjab-dakh : शेतकऱ्यांनी आपले उत्पादन कमी खर्चात कसे वाढवता येईल यावर भर द्यावा. तसेच आपल्या भागात जे पीक होते त्यावरच जास्त भर द्यावा. जसे नाशिक व खानदेशकडे द्राक्षाची शेती मोठ्या प्रमाणात होते. विदर्भात त्याला अनुसरून हवामान व जमिनीचा पोत नसल्यामुळे फायद्यात न राहता घाट्याचा सौदा होतो. यावर्षी पाऊस कमी पडेल परंतु उत्पादनात वाढ होईल हे लक्षात घ्यावे, असे प्रतिपादन हवामान तज्ञ व प्रगतीशिल शेतकरी पंजाब डख यांनी केले.
 

y20May-Panjabrav 
 
शेतकèयांनी सोशल मिडियावरच्या पोस्टमध्ये यंदा दुष्काळ स्थिती आहे, उत्पादन कमी होईल असे म्हटले आहे. पण असे होणार नाही. वेळोवेळी पाऊस येईल व त्याचा लाभ होईल. यंदा लवकर येणारे बियाणे घ्या व नियोजन लवकर करा, असेही मार्गदर्शन डख यांनी आर्णी येथे आयोजित शेतकरी मेळावा व चर्चासत्रात केले. भारती विद्यालयाच्या पटांगणात आर्णी येथे किसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालय, विकास बहुउद्देशीय संस्था, अंजली ड्रेसेसच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळावा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात पंजाब डख यांनी मार्गदर्शन केले व शेतकèयांच्या विभिन्न समस्यांवर उदाहरण देत, संवाद साधत मार्गदर्शन केले.
 
 
यावेळी मंचावर सेवानिवृत कामगार उपायुक्त राजेश आडे, गजानन सागरबाई रामचंद्र केने महाराज, अण्णा हजारे उर्फ प्रल्हाद इंगळे, संतोष श्रीवास, राजू इंगोले, तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल, राजू आंबेकर होते. हवामान तज्ञ पंजाब डख यांनी अनेक उदाहरणे देत शेतकèयांना सांगितले की, मागील दोन वर्षे या भागात भरपूर पाऊस पडला. तसेच यावर्षी जेमतेम पाऊस पडेल पण त्याने घाबरून जाऊ नका, यावर्षी उत्पादनात वाढ होईल. जून, जुलै, ऑगस्टमध्ये जेमतेम तर सप्टेंबरमध्ये परतीचा पाऊस जास्त होईल. त्यामुळे खरिपाचे आणि रबीचेही पीक चांगले होईल.
 
 
त्यांनी गारपीट, विजा कधी व कशा पडतात, गारपीट केव्हा, कशी व का होते, त्यापासून बचाव कसा करायचा याची विस्तृत माहिती देत उदाहरणासह पटवून दिले. शेतकèयांनी कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्याचे आवाहन करत तसे नियोजन करावे, असे हवामान तज्ञ पंजाब डख यांनी सांगितले.
 
 
यावेळी शहर व तालुक्यातील प्रगतशील शेतकरी वानखडे, कृषी उद्योजक शेतकरी दिलीप चिंतावार यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल यांनी केले. संचालन अजय छल्लाणी तर पंजाब डख यांचा परिचय राजेश श्रीवास यांनी केला. आभार प्रल्हाद इंगळे व संतोष श्रीवास यांनी मानले. कार्यक्रमासाठी शेतकरी व श्रीवास बंधू मित्रमंडळींनी प्रयत्न केले.