आनंदवार्ता! ७,००० हून अधिक अप्रेंटिस पदांची भरती

    दिनांक :20-May-2026
Total Views |
मुंबई
SBI apprentic देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) तब्बल ७,००० हून अधिक अप्रेंटिस पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेला १९ मेपासून सुरुवात झाली असून इच्छुक उमेदवारांना ८ जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. देशभरातील तरुण-तरुणींना या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

 SBI apprentice recruitment 2026 
या भरतीसाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून ती SBI च्या अधिकृत पोर्टलवरून करता येणार आहे. निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
या परीक्षेमध्ये एकूण १०० वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून प्रत्येक प्रश्नाला एक गुण असेल. चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंगची तरतूदही करण्यात आली आहे. परीक्षा कालावधी एक तासाचा असेल. या परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, इंग्रजी भाषा, गणित आणि तर्कशक्ती (रिझनिंग) या विषयांवर आधारित प्रश्नांचा समावेश असेल.
याशिवाय उमेदवारांची स्थानिक SBI apprentic  भाषेवरील पकड तपासण्यासाठी स्वतंत्र चाचणी घेण्यात येणार आहे. उमेदवाराला संबंधित स्थानिक भाषा वाचता, लिहिता आणि समजणे आवश्यक आहे.या भरतीसाठी वयोमर्यादा २० ते २८ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तसेच अर्ज शुल्क सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३०० रुपये ठेवण्यात आले आहे, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग (PwBD) उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.देशभरातील तरुणांसाठी ही बँकिंग क्षेत्रात प्रवेश करण्याची महत्त्वपूर्ण संधी मानली जात असून मोठ्या प्रमाणावर अर्ज अपेक्षित आहेत.