मानाचा तुरा... शिरापूरच्या केशर आंब्याची कतारमध्ये निर्यात

    दिनांक :20-May-2026
Total Views |
सोलापूर
Kesar mango export Qatar सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथील देवकाते फार्म्सच्या उच्च दर्जाच्या केशर आंब्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली छाप उमटवली असून, या हंगामात या आंब्याची थेट कतार देशात निर्यात करण्यात आली आहे. दर्जेदार उत्पादन, आधुनिक शेतीपद्धती आणि काटेकोर गुणवत्ता नियंत्रण यामुळे या आंब्याला परदेशात विशेष मागणी निर्माण झाली आहे. या यशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राला नवी ओळख मिळाली आहे.
 

Solapur Kesar mango export Qatar, 
शिरापूर येथील चंद्रकांत देवकाते यांच्या नेतृत्वाखालील देवकाते फार्म्स हे शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखले जाते. प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि सेंद्रिय शेती पद्धतींच्या आधारे त्यांनी सुमारे तीन एकर क्षेत्रात केशर आंब्याची दर्जेदार बाग विकसित केली आहे. या बागेतून उत्पादित झालेल्या आंब्याने यंदा गुणवत्ता आणि चव यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत पोहोचण्याचा मान मिळवला आहे.
 
 
परदेशी बाजारपेठेत Kesar mango export Qatar  फळांची निर्यात करताना विविध कठोर निकष आणि तपासण्या पार कराव्या लागतात. देवकाते फार्म्सच्या केशर आंब्याने हे सर्व निकष यशस्वीरित्या पूर्ण केले असून, त्याचा आकर्षक रंग, योग्य आकारमान आणि दीर्घकाळ टिकण्याची क्षमता यांमुळे कतारमध्ये या आंब्याला मोठी पसंती मिळत आहे. स्थानिक बाजारपेठेच्या तुलनेत परदेशात या आंब्याला अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोठा लाभ होत आहे.या निर्यातीतून मिळालेला दर सुमारे 600 रुपये प्रति किलो इतका असून, हा दर स्थानिक बाजारभावाच्या तुलनेत अधिक लाभदायक ठरत आहे. त्यामुळे केवळ देवकाते फार्म्सच नव्हे, तर संपूर्ण मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीही हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. या यशामुळे सोलापूर जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची नवी दारे उघडली गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.दरम्यान, या यशानंतर स्थानिक शेतकरी व कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांकडून देवकाते फार्म्सच्या प्रयत्नांचे कौतुक केले जात असून, योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे उत्पादन शक्य असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.