वर्धा,
Stop cattle during Bakri Eid जिल्ह्यात नियमितपणे होत असलेली अवैध गोवंश हत्या तसेच बकरी ईद दरम्यान केली जाणारी गोवंशाची कुर्बानी तात्काळ थांबवा, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक अधिनियम तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या स्टेट ऑफ गुजरात विरुद्ध मिर्झापूर मोती कुरेशी कसाब या ऐतिहासिक निकालाचा संदर्भ देत गोवंश संरक्षणासाठी कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या वतीने निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. भारतीय संस्कृतीत शेती, पर्यावरण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोवंशाचे संरक्षण करणे हे केवळ धार्मिक नव्हे तर संवैधानिक कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने सर्व सजीव प्राण्यांविषयी करुणा बाळगणे आवश्यक आहे. तसेच महाराष्ट्रात लागू असलेल्या कायद्यानुसार गोवंश हत्या हा दंडनीय गुन्हा असूनही काही ठिकाणी अवैधरित्या गोवंश वाहतूक, कत्तल व कुर्बानी सुरू आहे. या घटनांमुळे समाजातील धार्मिक भावना दुखावल्या जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शयता वाढत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
गोवंश संरक्षण ही भारतीय परंपरा, संत परंपरा व राष्ट्रपुरुषांनी दिलेली शिकवण असल्याचे नमूद करत श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या विचारांचाही उल्लेख करण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे संवेदनशीलतेने पाहून जिल्ह्यातील अवैध गोवंश हत्या तात्काळ बंद करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच बकरी ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदन देतेवेळी विहिंपचे जिल्हा मंत्री शरद कोणप्रतिवार, सहमंत्री संजय पोफळी, वर्धा जिल्हा सामाजिक समरसता विहिंप प्रमुख अशोक तट्टे, जिल्हा बजरंग दल संयोजक महेश राऊत, अमोल अतकर, प्रशांत यादव, श्रीकांत साटोणे, रवी बडवाईक, किरण उपाध्याय, गोविंद पांडे, महेश हटवार उपस्थित होते.