नवी दिल्ली
Melody इटली दौèययावर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांची भेट सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. राजकीय चर्चेपेक्षा या भेटीतल्या एका छोट्याशा गिफ्टने संपूर्ण इंटरनेटला वेड लावले आहे.
Melodyपंतप्रधान मोदींनी मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘मेलोडी’ टॉफी गिफ्ट दिली आणि त्यानंतर ‘मेलोडी’ हा शब्द पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला. विशेष म्हणजे इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी स्वतः हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर लोकांनी ब्लिंकिट, झेप्टो आणि इन्स्टामार्टवर मेलोडी शोधायला सुरुवात केली आणि काही भागांमध्ये ही टॉफी ‘आऊट ऑफ स्टॉक’ दिसू लागली.
Melodyराजकीय भेटीमध्ये दिलेल्या या छोट्या गिफ्टमुळे इतका मोठा इंटरनेट ट्रेंड तयार होईल, याची कुणालाच कल्पना नव्हती. सोशल मीडियावर मेलोडी मोमेंट, बेस्ट ब्रॅण्ड अॅम्बेसेडर्स आणि डिप्लोमॅटिक टॉफीअसे मीम्स व्हायरल झाले. काही युजर्सनी तर ‘पारले’ला यापेक्षा चांगली जाहिरात कधीच मिळणार नाही, अशा प्रतिक्रिया दिल्या.
Melody विशेष म्हणजे या व्हायरल क्षणाचा परिणाम थेट क्विक कॉमर्स अॅप्सवरही दिसला. अनेक शहरांमध्ये मेलोडी टॉफी आऊट ऑफ स्टॉक दिसू लागली. ब्लिंकिट आणि झेप्टोवर ‘आऊट ऑफ स्टॉक’ मेसेज दिसले, सोशल मीडियावर लोकांनी स्क्रीनशॉट्स शेअर करण्यास सुरुवात केली.