उकाड्यामुळे ट्रेन भट्टीसारख्या तापल्या

एसी बंद पडल्याने प्रवासी पडताहेत आजारी

    दिनांक :20-May-2026
Total Views |
लखनौ
Train AC तीव्र उष्णता आणि कडक उन्हामुळे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असह्य यातना सहन कराव्या लागत आहे. तांत्रिक बिघाड आणि प्रशासकीय निष्काळजीपणामुळे ट्रेनमधील आजारपण वाढत आहे. असाच काहीसा प्रकार छपरा-गोमतीनगर एक्सप्रेस आणि राप्ती सागर एक्सप्रेसमध्ये समोर आला. बोगीतील एसी कूलिंग सिस्टीम बंद पडल्याने आणि प्रचंड उष्णतेमुळे अनेक प्रवासी आजारी पडले. उलट्या, जुलाब आणि गुदमरल्याच्या तक्रारींनंतर ऐशबाग स्टेशनवर तातडीची वैद्यकीय मदत पुरवण्यात आली.
 

Train AC failure India, Chhapra Gomtinagar Express AC issue, 
ट्रेन क्रमांक 15053 छपरा-गोमतीनगर एक्सप्रेसच्या दुसऱ्या एसी डब्यातील (ए-1) प्रवाशांनी सांगितले की, एसी युनिट अचानक बंद पडले. बाहेरील उष्णता आणि खेळत्या हवेेच्या अभावामुळे काही मिनिटांतच संपूर्ण डबा धगधगत्या भट्टीसारखा गरम झाला. प्रवासी विनायक द्विवेदी आणि ज्ञानेश्वर पांडे यांनी सोशल मीडियावर रेल्वे प्रशासनाला टॅग करून विनंती केली की, डब्यात हवेच्या कमतरतेमुळे वृद्ध आणि लहान मुलांना गुदमरत आहे. परिस्थिती इतकी बिघडली की अनेक लहान मुले आणि वृद्ध लोकांना सतत उलट्या होऊ लागल्या. प्रवाशांनी तात्काळ तांत्रिक आणि वैद्यकीय पथके तैनात करण्याची मागणी केली, त्यानंतर ट्रेनला पुढील प्रमुख स्थानकावर आणण्यात आले.
 
 

बोगीतच प्रवाशांवर प्रथमोपचार
अशीच एक घटना ट्रेन Train AC क्रमांक 12521 राप्ती सागर एक्सप्रेसमध्ये घडली. ट्रेनमधील दोन प्रवाशांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाल्यानंतर ट्रेन ऐशबाग रेल्वे स्टेशनवर पोहोचताच ऐशबाग पॉलीक्लिनिकचे अतिरिक्त मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय तिवारी आणि त्यांच्या पॅरामेडिकल टीमने बोगीतच प्रवाशांना प्रथमोपचार देण्यास सुरुवात केली. त्यांना ओआरएस, औषधे आणि जीवनरक्षक इंजेक्शन्स देण्यात आली, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.