तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
ashok-uike : जिल्हास्तर आदिवासी समाजाच्या कृतज्ञता तथा कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन रविवार, 17 मे रोजी येथील सहकार भवनात करण्यात आले होते. या कृतज्ञता सोहळा व कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते बंडू मेश्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके व यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्या विशेष उपस्थितीत झाला.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाèया आणि सामाजिक क्षेत्रात मोलाचे कार्य करणाèया शंभराहून अधिक मान्यवरांचा सत्कार आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आला. इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंतांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बीना अशोक उईके, बिरसा क्रांतीदलाचे संस्थापक अध्यक्ष दशरथ मडावी, कोडापे, ट्रायबल फोरमचे संस्थापक अध्यक्ष अॅड. प्रमोद घोडाम, उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू चांदेकर, कोया पुनेम गोटुल समितीचे अध्यक्ष प्रल्हाद सिडाम, बाभुळगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी राजू मडावी, सांख्यिकी अधिकारी मनोज गेडाम, माजी पांढरकवडा नप अध्यक्ष भाऊराव मरापे, ज्येष्ठ पत्रकार बंडू सोयाम, महावितरण उपअभियंता रितेश पोयाम, नगरसेवक अनूप नैताम, मंदा माणिक मडावी, निकिता उईके उपस्थित होत्या.
दिल्ली विद्यापीठातून डॉक्टरेट मिळालेल्या डॉ. तुषार आत्राम व डॉ. प्रफुल्ल आडे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. राजू मडावी यांचा गटशिक्षणाधिकारीपदी पदोन्नतीबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. तुषार आत्राम यांनी केले. कार्यक्रमाचे विशेष अतिथी प्राचार्य डॉ. अशोक उईके म्हणाले, एकत्रित प्रयत्नांनी समाज पुढे जातो. ज्या व्यक्ती आणि संस्था व संघटनांनी आमच्या या प्रवासात निस्वार्थपणे योगदान दिले त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आमचे परम कर्तव्य आहे. समग्र आदिवासी समाजाने एकजुटीने राहून आदिवासींवर होणाèया अन्यायाविरुद्ध आवाज उठवला पाहिजे व आदिवासी समाजातील शेवटच्या बांधवांच्या विकासासाठी संयुक्त प्रयत्न केले पाहिजे, मी सदैव यासाठी आपण सर्वांसोबत आहे.
अॅड. प्रियदर्शनी उईके, दशरथ मडावी, अॅड. प्रमोद घोडाम, राजू चांदेकर, कोडापे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात इयत्ता दहावी व बारावी तसेच कला, वाणिज्य, विज्ञान क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त, एमबीबीएस, इंजिनीअरिंग क्षेत्रात, तसेच सामाजात उल्लेखनीय कार्य करणाèया समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला. यासाठी विविध संघटनांचे पदाधिकारी, सदस्य आणि यवतमाळ शहरातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. प्रफुल आडे यांनी तर आभार सुभाष गेडाम यांनी मानले.
यासाठी नंदू अरके, अरुण पोयाम, राजू गेडाम, अशोक गेडाम, राजू किनाके, किशोर सलामे, माणिक मडावी, विजय मडकाम, पुरुषोत्तम घोडाम, पवन मंगाम, आकाश चांदेकर, नीलेश चांदेकर, अविनाश पेंदाम, राजेश नागभीडकर, आशिष मेश्राम यांनी परिश्रम घेतले.