ऑनलाइन औषध विक्री विरोधात एल्गार

जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद

    दिनांक :20-May-2026
Total Views |
वर्धा, 
Uprising Against Online Medicine Sales ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्टच्या आवाहनानुसार बुधवार २० रोजी ऑनलाइन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात जिल्ह्यातील किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांनी आज एकदिवसीय बंद पाळला. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील बहुतांश मेडिकल स्टोअर्स आणि औषध एजन्सी दिवसभर बंद राहिल्या. मात्र, या बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सुमारे ७७० मेडिकल स्टोअर्स आणि जवळपास १४० औषध एजन्सी कार्यरत आहे. अनेक वर्षांपासून ऑनलाइन औषध विक्रीला विरोध करणार्‍या औषध विक्रेत्यांनी सरकारकडे कठोर नियम लागू करण्याची मागणी करत हे आंदोलन पुकारले. ऑनलाइन औषध विक्री करणार्‍या कंपन्या ड्रग अ‍ॅट १९४० आणि नियम १९४५ चे पालन न करता बेकायदेशीररित्या व्यवसाय करत आहे.
 
 
 

Uprising Against Online Medicine Sales 
 
 
त्यामुळे पारंपरिक औषध व्यवसायावर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप करण्यात आला. बंददरम्यान जिल्ह्यात जवळपास ८० टके मेडिकल स्टोअर्स बंद होती. वर्धा शहरातील प्रमुख औषध बाजारातही दिवसभर शांतता होती. मेडिकल स्टोअर्स बंद असल्यामुळे रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेल्या रुग्णांना आणि नातेवाईकांना औषधे मिळवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. आवश्यक औषधांसाठी भटकंती करावी लागली. वर्धासह जिल्ह्यातील विविध तालुयांमध्ये औषध विक्रेता संघटनांनी सरकारच्या नावाने निवेदनेही सादर केली. ऑनलाइन औषध विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदे लागू करावे आणि पारंपरिक औषध विक्रेत्यांना संरक्षण द्यावे, अशी मागणी व्यापार्‍यांनी केली.
 
 
 
हिंगणघाटात १०० टके बंद
देशव्यापी बंद अंतर्गत हिंगणघाट शहरातील औषध विक्रेत्यांनी पाठिंबा देत आपली मेडिकल स्टोअर्स स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. शहरातील १०० टके औषध विक्रेत्यांनी बंदमध्ये सहभाग घेतला. सर्वोच्च न्यायालयानेही आवश्यक निर्बंध आणि कायदेशीर सुधारणा करण्याचे निर्देश दिले आहे. मात्र, केंद्र सरकारने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नाही. हिंगणघाटमधील औषध विक्रेत्यांनी एकत्र येत बंदमध्ये सहभाग घेतला.