मुंबई,
What happened to Salman Khan बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा सोशल मीडियावरील पोस्ट्समुळे चर्चेत आला आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर सलमानने इंस्टाग्रामवर सलग चार पोस्ट शेअर केल्या, ज्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. नेहमी फारसे सक्रिय नसणारा सलमान अचानक इतक्या पोस्ट्स करतोय, यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या पोस्ट्समध्ये सलमानचा वेगवेगळा भावनिक आणि आक्रमक मूड दिसत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. पहिल्या पोस्टमध्ये त्याने माध्यमांबद्दल नाराजी व्यक्त केल्यासारखा सूर दिसला. काही लोक त्याच्या वैयक्तिक वेदनेचा उपयोग मनोरंजनासाठी करत असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख त्याने केल्याचे समजते.

दुसऱ्या पोस्टमध्ये त्याने काही लोक अडचणी किंवा नुकसानातून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा इशारा दिला. चित्रपट महत्त्वाचा की माणसाचं आयुष्य?” असा प्रश्न उपस्थित करत त्याने अप्रत्यक्षपणे काही घटकांवर निशाणा साधल्याची चर्चा आहे.तिसऱ्या पोस्टमध्ये सलमानने अधिक तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिल्याचे दिसते. मी शांत आहे म्हणून मला कमकुवत समजू नका असा संदेश देण्याचा प्रयत्न त्याने केल्याचे चाहत्यांचे मत आहे. या पोस्टमधील काही वाक्यांमुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना सुरुवात झाली.
सर्वाधिक चर्चेत असलेली चौथी पोस्ट होती, ज्यात सलमानने 60 वर्षांचा झालो असलो तरी लढणं विसरलो नाही असे म्हटले आहे. या ओळींनंतर सोशल मीडियावर विविध तर्क लावले जात आहेत. काहींनी हे अप्रत्यक्ष इशारे मानले, तर काहींनी त्याला भावनिक प्रतिक्रिया म्हणून पाहिले आहे.या सर्व पोस्ट्स काही वेळातच प्रचंड व्हायरल झाल्या असून लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे. चाहत्यांनी सलमानच्या स्टाईलचे कौतुक करत भाई अजूनही तसाच आहे अशा प्रतिक्रिया दिल्या, तर काहींनी त्याच्या मानसिक स्थितीबाबतही चिंता व्यक्त केली आहे.