यवतमाळ भाजपाचे पं. दीनदयाल प्रशिक्षण महाभियान यशस्वी

विदर्भातील अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन

    दिनांक :20-May-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
pandit-deendayal-training-campaign : भारतीय जनता पार्टी यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने स्थानिक पंडित दीनदयाल प्रबोधिनी निळोणा येथे जिल्हास्तर निवासी पं. दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांच्या मार्गदर्शनात आयोजन समितीच्या वतीने या प्रशिक्षण वर्गाचे शिस्तबद्ध व काटेकोर नियमांचे पालन करून आयोजन करण्यात आले होते.
 

y20May-B-J-P 
 
 
या दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गात विदर्भातील भारतीय जनता पार्टीच्या अनेक मान्यवर नेत्यांचे मार्गदर्शन जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षणार्थींना करण्यात आले. यात प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्याचे विधानसभा प्रभारी आमदार सुमित वानखडे उपस्थित होते. या सर्व प्रशिक्षणांकरिता विदर्भातील शिवराय कुळकर्णी, नितीन भुतडा, डॉ. उपेंद्र कोठेकर, धर्मपाल मेशाम, शिवानी दाणी, राजीव पोतदार, दिनेश सूर्यवंशी, आमदार प्रवीण दटके, सागर फुंडकर यांनी वक्ते म्हणून हजेरी लावली.
 
त्यात एकात्मिक मानव दर्शन, सांस्कृतिक राष्ट्रवाद, बूथ नियोजन, मन की बात, भारत सरकारच्या गरीब कल्याणकारी योजना, पक्ष कार्यकर्ता विकास, सोशल मिडिया, देशासमोरील राजनीतिक व सामाजिक समस्या, कार्यविस्तार, भारतीय जनता पार्टीचा इतिहास अशा विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला.
 
 
 
या प्रशिक्षण वर्गाकरिता प्रशिक्षणार्थी म्हणून आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, जिल्ह्याचे नेते व माजी राज्यमंत्री मदन येरावार, आमदार राजू तोडसाम, यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अ‍ॅड. प्रियदर्शिनी उईके प्रामुख्याने निवासी उपस्थित होते.
 
 
 
या अभ्यासवर्गाकरिता यवतमाळ, वणी, राळेगाव व केळापूर विधानसभा क्षेत्रातील भाजपाचे अपेक्षित सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या वर्गासाठी वर्गप्रमुख सूरज गुप्ता, प्रभारी कीर्ती राऊत, महामंत्री राजू पडगिलवार, शंतनू शेटे, महामंत्री रेखा कोठेकर, शैला मिर्झापुरे, अ‍ॅड. प्राजक्ता टिकले, निर्मला विणकरे, योगेश पाटील, नितीन गिरी, प्रलय टिप्रमवार, गजानन भोकरे, ज्ञानेश्वर सुरजुसे व भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाèयांनी परिश्रम घेतले.