नागपूर,
YCCE Students यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय (YCCE) येथील रसायनशास्त्र विभागातर्फे बी.टेक. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी अमूल वसुंधरा डेअरी (दूध प्रकल्प), नागपूर येथे औद्योगिक भेट आयोजित करण्यात आली. ही भेट डॉ. प्राजक्ता वाघे, विभागप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्रुती गोमकाळे यांनी यशस्वीरीत्या समन्वयित केली. या उपक्रमासाठी इतर प्राध्यापकांचेही सहकार्य लाभले.

भेट यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री. अजित चौहान यांनी दिलेल्या मौल्यवान सहकार्याबद्दल विभागातर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या औद्योगिक भेटीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना औद्योगिक कार्यपद्धतीचे प्रत्यक्ष ज्ञान मिळवून देणे तसेच सैद्धांतिक ज्ञान आणि औद्योगिक प्रक्रियेमधील दरी कमी करणे हा होता. YCCE Students या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना दूध प्रक्रिया चक्र (संकलन, पाश्चरायझेशन, पॅकेजिंग), दुग्ध उत्पादनातील आधुनिक स्वयंचलित तंत्रज्ञान, गुणवत्ता नियंत्रण व स्वच्छता मानके तसेच पुरवठा साखळी व वितरण व्यवस्था याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी या भेटीत उत्साहाने सहभाग घेतला. ही भेट अत्यंत माहितीपूर्ण व ज्ञानवर्धक ठरली असून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष औद्योगिक कार्यपद्धती समजून घेण्यास मोठी मदत झाली.
सौजन्य: राजेंद्र पहाडे, संपर्क मित्र