पक्ष कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण
वाशीम,
येथील काँग्रेसचे पक्षनिष्ठ कार्यकर्ते Raju Chaudhary राजू उर्फ विठ्ठल पांडुरंग चौधरी यांच्या खांद्यावर वाशीम जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा दिल्याने पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात उत्साहाची वातावरण निर्माण णाले आहे. राजू चौधरी हे गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांनी काँग्रेस पक्षात विविध पदे भूषविली आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक, माजी जिल्हा परिषद सदस्य तर विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून ते काम पाहत आहेत.
Raju Chaudhary आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी आता त्यांच्यावर असणार आहे. राजू चौधरी यांची सहकार क्षेत्रात मोठे वजन आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. राजू चौधरी यांची काँग्रेस वाशीम जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. संघटनात्मकदृष्ट्या पक्षाला बळ मिळणार असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला त्यांच्या निवडीचा फायदा होईल, असे कार्यकर्त्यात बोलल्या जात आहे. सद्याची काँग्रेस पक्षाची स्थिती पाहता अनेकांनी काँग्रेसला हात दाखविला असला तरी राजू चौधरी हे पक्षसंघटनेत सक्रीय राहीले. पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचेवर मोठी जबाबदारी दिली आहे.
छायाचित्र - राजू चौधरी