वर्धा काँग्रेस पुन्हा कोल्हेंच्या हवाली

    दिनांक :21-May-2026
Total Views |
पुन्हा माजी आ. रणजित कांबळेंचे वर्चस्व
 
वर्धा, 
वर्धा जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी Sunil Kolhe सुनील कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. ते यापूर्वीही जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष होते, हे उल्लेखनिय! जिल्हाध्यक्षपदाच्या शर्यतीत शेखर शेंडे, प्रवीण हिवरे, प्रभा राव यांच्या कन्या अ‍ॅड. चारूलता टोकस सारखे दिग्गज असताना कोल्हे यांचे नाव पुढे आल्याने आश्चर्य व्यत करण्यात येत आहे.
 
 
con  dksl
 
Sunil Kolhe  सुनील कोल्हे हे माजी आमदार रणजित कांबळे यांच्या गटाचे आहे. जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनोज चांदुरकर होते. ते जि. प. सदस्य राहित्याने ग्रामीण भागात त्यांची चांगली पकड होती. एकेकाळी वर्धा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मध्यंतरी काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे जिल्ह्यात खिंडार पडत गेले. याचाच परिणाम म्हणून २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत देवळी-पुलगाव मतदार संघातून रणजित कांबळेच विजयी झाले. तर इतर तिनही विधानसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार निवडून आले. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अमर काळे विजयी झाले. यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्याला यश मिळेल असे, काँग्रेसला वाटत होते. परंतु, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला. सर्व ठिकाणी भाजपाचे उमदेवार विजयी झाले. आता जिल्ह्याचा विचार केला तर एक खासदार तसेच वर्धा आणि पुलगाव येथे नगराध्यक्ष आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा उभारी देण्याचे आवाहन नवीन जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर आहे. कोल्हे यांच्या नियुतीने मुळ काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह नाही, हे उल्लेखनिय!