चोरीस गेलेल्या मुद्देमालासह आरोपी महिलेला अटक

    दिनांक :21-May-2026
Total Views |
रिसोड पोलिसांची धाडसी कामगीरी
 
वाशीम, 
Accused woman arrested रिसोड येथील बसस्थानकारुन प्रवाशी महिलेची सोन्याचे दागीने व रोख रक्कम असलेली पर्स लंपास करणार्‍या एका महिला आरोपीला रिसोड पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक करुन तिच्याकडून चोरी गेलेला ६.१२ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला. याबाबत सविस्तर असे की, फिर्यादी सुनंदा बळीराम धांडे वय ५९ वर्ष रा. कमलानगर ता. शहापुर जि. ठाणे ह्या त्यांचे रिसोड येथील नातेवाईक प्रकाश मोरे यांचेकडे आल्या होत्या त्या २० मे रोजी परत गावी जाण्यासाठी रिसोड बसस्थानकावर आल्या असता त्यांची पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यामध्ये सोन्याची एक पोत,दोन कर्नफुले, एक अंगठी व रोख २८०० रुपये तसेच मोबाईल असा एकुण ६ लाख १२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल दिसला नाही.
 
 
mahila
 
याबाबत रिसोड पोलिसा तक्रार दिली. त्यावरुन पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही तपासणी केली. तसेच सायबरच्या मदतीने तांत्रीक व आधुनि पद्धतीने मोबाईल संबंधाने माहीती घेवून गोपनिय माहीतीच्या आधारे सेनगांव जि. हिंगोली कडे जाणारो खासगी वाहनातील प्रवाशांची तपासणी केली असता एक महिलेची हालचाल संशयास्पद दिसून आली. तीचे नाव गाव विचारले असता तीने तीचे नाव वत्सला दगडु तुरुकमाने वय ६० रा. काहकर ता. सेनगाव जि. हिंगोली असे सांगीतले. सदर महीलेची तेथील इतर महीलेच्या हस्ते तपासणी केली असता त्या महीलेजवळ रिसोड बस स्थानकावरुन चोरी गेलेली पर्स व त्यामधील मुद्देमाल मिळुन आला.
 
 
Accused woman arrested  सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, अपर पोलिस अधीक्षक लता फड, सहा. पोलिस अधीक्षक नवदिप अग्रवाल यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. रामेश्वर चव्हाण, पोउपनि सचिन गोखले, पोउपनि रामेश्वर नागरे, पोहेकॉ प्रशांत राजगुरु, पोकॉ विनोद घनवट, पोकॉ रवी अडागळे, हेमंत सरकटे, निवोद मस्के, परमेश्वर भोणे, मपोकॉ वृषाली ढगे, सुषमा गायकवाड, पोकॉ किशोर इंगोले यांनी केली.