सिटी हॉस्पिटलला भीषण आग... बचाव कार्य सुरु

    दिनांक :21-May-2026
Total Views |
अकोला,
City Hospital fire अकोला शहरात सिटी हॉस्पिटल परिसरात गुरुवारी भीषण आग लागल्याची घटना घडली असून या घटनेमुळे काही काळ परिसरात मोठी घबराट पसरली. आग लागल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने हालचाली करत रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवले, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट झाले आहे.
 

Akola City Hospital fire 
आग रुग्णालयाच्या एका भागात अचानक लागली आणि काही क्षणांतच धूर पसरू लागला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने रुग्णांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. काही रुग्णांना स्ट्रेचरवरून तर काहींना व्हीलचेअरच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेमुळे रुग्णालय परिसरात City Hospital fire  काही वेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या निर्णयांमुळे मोठा अनर्थ टळला. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून आगीचे कारण शोधण्यासाठी तांत्रिक तपासणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.दरम्यान, या घटनेनंतर शहरातील रुग्णालयांच्या अग्निसुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची गरज असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.