तभा इफेट
अल्लीपूर,
Allipur Veterinary Hospital येथील पशुवैद्यकीय रुग्णालयातील कर्मचार्यांच्या रित जागांची कहाणी असलेली पशु रुग्णालय ‘प्रथम’ श्रेणी सेवा ‘शून्य’ या मथळ्याचे वृत्त तरुण भारतमध्ये २० रोजी प्रकाशित होताच आ. राजेश बकाने यांनी दखल घेत तातडीने जिल्हा आरोग्य अधिकार्यांशी संपर्क करून अल्लीपूर पशुवैद्यकीय दवाखान्यात नियमित कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सुचना केल्या.
Allipur Veterinary Hospital तळेगाव येथील मंदार मराठे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला. आज २१ रोजी डॉ. राजपूत यांनी सकाळीच येत ओपीडी सेवा देऊन दवाखाना सुरू केला. त्यांच्याकडील कार्यभार हा डॉ. मंदार मराठे यांच्याकडे देण्यात येत असल्याची माहिती राजपूत यांनी दिली. डॉ. राजपूत यांच्याकडे कात्री, कानगाव येथील पशुवैद्यकीय दवाखाने असल्यामुळे डॉ. मराठे यांच्याकडे दैनंदिन ओपीडी देण्यात आली आहे. येथे नियमित ओपीडीसाठी नियमित डॉटरची आवश्यकता आहे. येथे तिन्ही जागा रित असून त्या जागी नियमित कर्मचारी उपलब्ध व्हावे अशी अल्लीपूर आणि परिसरातील गोपालकांनी मागणी केली आहे. तसेच आ. राजेश बकाने यांनी दखल घेऊन येथील पशुपालकांची व्यथा संमजून घेतल्या बद्दल गोपालकांनी त्यांचेही आभार मानले.