जनावर चोरांचे वाहन सापडले : टोळी फरार

    दिनांक :21-May-2026
Total Views |
पोलिस तपास संथ, पशूपालकांमध्ये संताप

काळीदौलत, 
Animal Thief तालुक्यातील काळीदौलत परिसरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या जनावरे चोरीच्या घटनांनी पशुपालकांची झोप उडवली आहे. चोरीसाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले विना क्रमांकाचे चारचाकी वाहन पोलिसांच्या हाती लागले असले तरी या घटनांमागील मुख्य टोळी अद्याप फरार असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी काळीदौलत येथील ‘देवाचा वाडा’ परिसरात दोन चारचाकी वाहनातून जनावरे चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. चोरांनी सात जनावरांना गुंगीचे इंजेक्शन देऊन त्यांना बेशुद्ध केले व चारचाकी वाहनात टाकून नेत असताना पोलिसांचे पेट्रोलिंग वाहन आल्याने चोर ती जनावरे सोडून पसार झाले.
 
 
cow
 
पोलिसांनी काही अंतरापर्यंत त्या दोन वाहनांचा पाठलाग केला. मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. मात्र पोलिसांच्या भीतीने चोरट्यांनी आपले चारचाकी वाहन भरभाव वेगात पळविल्याने चालकाचे नियंत्रण सुटले व भरभाव वाहन मोहदी समोर पुलावरून खाली कोसळुन अपघात झाला व चोरटे वाहन सोडून पसार झाले. ही अपघाताची घटना दुसèया दिवशी सकाळी उघडकीस आली, पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढले व वाहनाची तपासणी केली असता त्या वाहनातील मागील सीट काढण्यात आल्याचे आणि जनावरे वाहतुकीसाठी वाहनात बदल करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.
 
 
Animal Thief विशेष म्हणजे, या वाहनात गुंगीचे तीन इंजेक्शनही सापडले. त्यामुळे जनावरे चोरी करणारी संघटित टोळी सक्रिय असल्याचे दिसत आहे. पोलिसांनी वाहन ताब्यात घेत पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात लावून तपास सुरू केला. मात्र अद्याप आरोपींपर्यंत पोचण्यात यश आलेले नाही. यापूर्वीही काळीदौलत परिसरात एका रात्रीत अनेक जनावरे चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही शेतकèयांच्या गोठ्यातून बैल, गायी व वासरे चोरीला गेल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नागरिकांत चोरीच्या घटनांमध्ये स्थानिकांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलिसांनी स्थानिक संशयितांचीही चौकशी करावी, या प्रकरणाचा सखोल तपास करून टोळीचा तातडीने पर्दाफाश करावा, सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, वाहनाची माहिती आणि परिसरातील हालचालींचा तपास करून आरोपींना तत्काळ अटक करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.