दोन सदस्य अपात्र ठरल्याने राजकीय डाव उधळला
कारंजा लाड,
Belkhed: No-Confidence Motion तालुयातील बेलखेड ग्रामपंचायतीत उपसरपंचांविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव तहसील प्रशासनाने फेटाळून लावल्यानंतर राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आवश्यक दोन तृतीयांश सदस्यांचा निकष पूर्ण न झाल्याने हा प्रस्ताव ग्राह्य धरता येत नसल्याचे स्पष्ट करत तहसीलदार रवि महाले यांनी संबंधित अर्ज खारीज केला. त्यामुळे विरोधकांची खेळी उलटल्याची चर्चा गावात रंगू लागली आहे.
Belkhed: No-Confidence Motion बेलखेड ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुरेश विठुजी बहुटे यांच्या विरोधात काही सदस्यांनी १९ मे रोजी अविश्वास ठरावाचा अर्ज तहसीलदार कार्यालयात दाखल केला होता. मात्र, या अर्जाच्या पडताळणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. ग्रामपंचायतीची एकूण सदस्यसंख्या सरपंचासह सात असली तरी त्यातील एका सदस्याला यापूर्वीच अपात्र ठरविण्यात आले असल्याचे प्रशासनाच्या नोंदीत स्पष्ट झाले.याशिवाय ग्रामविकास अधिकार्यांच्या अहवालानुसार सदस्य गोपाल डिगांबर वानखडे आणि छाया भगवान आमटे हे ग्रामपंचायत बैठकीस सतत गैरहजर राहत असल्याने मुंबई ग्रामपंचायत नियम १९५९ नुसार त्यांची पदे रिक्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत प्रत्यक्षात केवळ चार सदस्य कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले.दरम्यान, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ च्या कलम ३५ नुसार उपसरपंचांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यासाठी दोन तृतीयांश सदस्यांचे समर्थन आवश्यक असते. कार्यरत सदस्यसंख्या चार असल्याने किमान तीन सदस्यांची आवश्यकता होती. मात्र प्रस्तावावर पात्र असलेल्या केवळ दोन सदस्यांच्या स्वाक्षर्या असल्याने आवश्यक निकष पूर्ण झाला नाही. परिणामी तहसील प्रशासनाने प्रस्ताव थेट फेटाळून लावला.या घडामोडीमुळे बेलखेड ग्रामपंचायतीतील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. अविश्वास ठरावाचा डाव फसल्याने विरोधकांना मोठा धक्का बसला असून उपसरपंच समर्थकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्यामुळे गावातील सत्तासंघर्ष आता आणखी रंगण्याची शयता व्यक्त केली जात आहे.