कारची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर

    दिनांक :21-May-2026
Total Views |
- गोरेगाव-तिरोडा मार्गावरील मंगेझरी गाव शिवारातील घटना

गोंदिया, 
Car-Two-wheeler Accident गंगाझरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोरेगाव-तिरोडा मार्गावरील मंगेझरी येथील नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या चौकीजवळ गुरुवारी झालेल्या कार आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी २१ मे रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. चक्रधर मूलचंद कावळे व अश्विनी कावळे दोघेही रा. मेंढा ता. तिरोडा अशी जखमींची नावे आहे. दोघांवरही गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमीक उपचार करून पुढील उपचारासाठी गोंदियाच्या केटीएस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 
 
car
 
Car-Two-wheeler Accident  मिळालेल्या माहितीनुसार चक्रधर कावळे हे पत्नी अश्विनी यांच्यासह दुचाकीने गोरेगाव येथे काही कामानिमीत्त आले असता स्वगावी मेंढा येथे परत जात असताना विरुद्ध दिशेने येणार्‍या कार क्रमांक एमएच ३१ एफआर १३६२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगात चालवून दुचाकीला समोरासमोर धडक दिली. ज्यामध्ये दुचाकीस्वार चक्रधर व अश्विनी दोघेही गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी गोंदिया जिल्हा रुग्णालयात रेफर केले. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पंचायत समितीचे माजी सभापती मनोज बापचे यांनी तात्काळ रुग्णालयात भेट देत जखमींची आस्थेने विचारपूस केली. तसेच डॉक्टरांकडून उपचाराची माहिती घेत आवश्यक मदत व मार्गदर्शन केले. यावेळी माजी जि. प. सभापती विश्वजीत डोंगरे, खाडीपारचे उपसरपंच गुड्डू कावळे उपस्थित होते. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची नोंद गंगाझरी पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
...