जनगणनेच्या कामात नियोजनाचा अभाव

    दिनांक :21-May-2026
Total Views |
कोणाला १५ तर कोणाला ४०० घरं
 
वर्धा, 
Census Planning चुकीच्या पद्धतीने केलेल्या सीमांकनामुळे जनगणनेतील काही प्रगणकांना ४०० पेक्षा अधिक कुटुंबाची तर काहींना १५ ते ३० कुटुंबाचीच गणना करावी लागत आहे. १८० ते २०० कुटुंबासाठी एक प्रगणक नियुत करण्याचे निर्देश आहे. मात्र, तलाठ्यांनी केलेल्या आरेखानानुसार क्षेत्र वाटप केल्याने या जनगणनेच्या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. या प्रकारामुळे उन्हात काम करणार्‍या शिक्षकांनी प्रचंड नाराजी व्यत केली आहे. जनगणनेसाठी आणि मतदार पडताळणी (एसआयआर) ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरू आहे. संबंधित यंत्रणांच्या राज्यस्तरीय सनियंत्रण अधिकार्‍यांनी सूचना दिल्यानंतर सुद्धा आणि निवासी उपजिल्हाधिकार्‍यांनी पत्र काढल्यानंतर सुद्धा अनेक प्राथमिक शिक्षकांना जनगणना व बीएलओ म्हणून मतदार पडताळणी अशी दोन्ही कामे करावी लागत आहे.
 
 
cen
 
तर तालुयात यशवंत शिक्षण संस्थेमधील अनेक शिक्षकांना कोणतेच काम नाही. या संस्थेच्या काही मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांची नावेच प्रशासनाला कळविलेली नाही, हे उल्लेखनिय! तसेच वर्धा पंचायत समिती शिक्षण विभागातील सुद्धा अनेक शिक्षकांची नावे कळविल्या गेली नसल्याने ते शिक्षक उन्हाळी सुट्टीचा मनमोकळेपणाने आनंद घेत आहे. अशा शिक्षकांची संख्या ५० पेक्षा अधिक असल्याची खात्रीशीर माहिती आहे. यामध्ये हितसंबंध जोपासून जाणीवपूर्वक काही नावे कळवल्या गेली नाही तर काही नावे चुकून सुटली असण्याची शयता आहे. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयात संपर्क साधून काहींनी स्वतःची नावे कमी करून घेतल्याचीही चर्चा आहे. वर्धा पंचायत समिती मधील एका शिक्षिकेने जनगणनेच्या कामातून आपली नियुती रद्द करून घेतली आणि ती शिक्षिका सीईओंची परवानगी न घेता परदेशवारीला गेली असल्याचे समजते.
 
 
Census Planning  जनगणना व मतदार पडताळणीचे काम असणार्‍या शिक्षकांनी प्रशासनाच्या लक्षात आणून दिले. गाव वगळून परगावात काम देण्यात आले. प्रगणक म्हणून अनेक शिक्षकांना मोकळे सोडले असतानाच काही शिक्षकांकडे अनेक ठिकाणची कामे देण्यात आली आहेत. दोन गावातील अंतराचा विचार सुद्धा करण्यात आला नाही. बर्‍याच ठिकाणीचे अंतर ५ किमी पेक्षा अधिक आहे. १६ मे रोजी काम सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातील प्रगणकांना प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याचे साहित्याचे वितरण १८ मे रोजी सायंकाळ पासून सुरू झाले. त्यामुळे या कामात सातत्याने नियोजनाचा अभाव दिसून येत आहे.
 
 
वर्धा तालुयातील भुगाव नजिक असलेल्या चिंचाळा रिट येथे एकाच व्यतीकडे ४०० पेक्षा जास्त तर हिंगणघाट नगर पालिका क्षेत्रातील गिमा टेस परिसरातील ५०० घरांची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. या संदर्भात निवासी जिल्हाधिकारी संजय जाधवर यांच्यासोबत संपर्क साधला असता आम्ही पुर्णपणे नियोजन केलेले आहे. अशी चुक कुठे असेल असे वाटत नाही. परंतु, आपल्याकडे काही माहिती असल्यास आम्ही त्याची चौकशी करू असे ते म्हणाले. तर वर्धेचे तहसीलदार संदीप फुंडेकर यांनी तरुण भारत प्रतिनिधीला स्वत: फोन करून आपल्याकडे काही माहिती असल्यास आम्हाला उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली. आम्ही त्याची चौकशी करू असे सांगितले. दरम्यान, माहिती देताच त्यांनी संबंधीत व्हॉट्अ‍ॅपग्रुपवर अशी कोणतीही माहिती बाहेर जाता कामा नये, अशी तंबी दिली.