नागपूर,
Doha-Nagpur Air Service नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कतारची राजधानी दोहासाठीची थेट विमानसेवा पुन्हा सुरू झाली आहे. इराणमधील युद्ध आणि तणावामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून कतार एयरवेजने २७ फेब्रुवारी रोजी आपली शेवटची उड्डाण करून ही सेवा तात्पुरती बंद होती. मात्र, आता परिस्थिती सुधारल्याने आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन तब्बल ८२ दिवसांनंतर ही सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
Doha-Nagpur Air Service उन्हाळी वेळापत्रकानुसार या फ्लाईटच्या वेळेत थोडा बदल करण्यात आला आहे. दोहा ते नागपूर हे विमान पूर्वी रात्री २.२० वाजता नागपूर विमानतळावर उतरायचे, आता ते रात्री २.४५ वाजता येईल आणि दोहासाठी उड्डाण घेण्याची वेळ पूर्वी पहाटे ३.५० वाजताची होती, ती आता बदलून पहाटे ४.१५ वाजता करण्यात आली आहे.