जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध अफवांवर विश्वास ठेऊ नये
बुलढाणा,
Guardian Minister Makarand Patil जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणार्या अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगून आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधन तुटवड्याच्या अफवामुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर गर्दी होत असून अनावश्यक इंधन साठा जमा करताना दिसून येत आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा समाधानकारक साठा उपलब्ध असून पुरवठा साखळी पूर्णपणे सुरळीत असल्याने नागरिकांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी. आवश्यक तेवढेच इंधन खरेदी करावे, यामुळे सर्वांना इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. जिल्हा प्रशासन सर्व ऑईल कंपन्या आणि पेट्रोल पंप धारकांच्या सतत संपर्कात आहे. पेट्रोल पंपांवर इंधनाचे वाटप सुरळीत व्हावे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनालाही आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात दि. २१ मे विविध ऑईल कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात इंधनाचा पुरवठा झाला आहे. यामध्ये इझउङ कडून १ लाख २ हजार ५०० लिटर पेट्रोल आणि ३ लाख ५ हजार ५०० लिटर डिझेल, कझउङ कडून १ लाख ५ हजार लिटर पेट्रोल आणि ३ लाख ७४ हजार लिटर डिझेल, तर खजउङ कडून ६ लाख ८० हजार लिटर पेट्रोल आणि ७ लाख २५ हजार लिटर डिझेलचा पुरवठा करण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण ८ लाख ८७ हजार ५०० लिटर पेट्रोल आणि १४ लाख ४ हजार ५०० लिटर डिझेल उपलब्ध असून दररोज नव्याने इंधनसाठा प्राप्त होत आहे.
Guardian Minister Makarand Patil गॅस सिलेंडरबाबतही जिल्ह्यात कोणतीही कमतरता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियमचे नियमित ४ लाख ६३ हजार ४९४ ग्राहक असून उज्वला योजनेंतर्गत २ लाख ५ हजार ७१५ ग्राहकांना सेवा दिली जात आहे. दररोज सुमारे ७ हजार ९५० गॅस सिलेंडर ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात येत असून १६ हजार ४४८ सिलेंडरचा साठा राखीव आहे. कंपन्यांकडून दररोज याच पद्धतीने इंधनाचा पुरवठा होणार असल्याचे पुरवठा शाखेने सांगितले आहे. शेतकर्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढे इंधन उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकर्यांनी केवळ आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावे. शासन शेतकर्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागरिकांनी इंधनाचे साठेबाजी करू नये तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री मकरंद पाटील यांनी केले आहे.