आयएचआरएच्या विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी डॉ. साठे

    दिनांक :21-May-2026
Total Views |
अण्णा हजारे यांच्या हस्ते नियुतीपत्र प्रदान
 
वर्धा, 
IHRA: Dr. Mangesh Sathe आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारासाठी कार्य करणार्‍या इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन (आयएचआरए) या संघटनेच्या दिल्ली येथे पार पडलेल्या केंद्रीय बैठकीत येथील डॉ. मंगेश साठे यांची विदर्भ प्रदेश अध्यक्षपदी नियुती करण्यात आली. ही नियुती महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मंगेश चोरे (पाटील) यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय समितीकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते डॉ. मंगेश साठे यांना नियुतीपत्र प्रदान करण्यात आले.
 
 
sathe
 
IHRA: Dr. Mangesh Sathe  यावेळी अण्णा हजारे यांनी मानवाच्या अधिकारांचे उल्लंघन हा गंभीर अपराध असून समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी अशा संघटनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पीडित आणि शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत राहिली पाहिजे, असेही ते म्हणाले. मंगेश चोरे यांनी विदर्भातील अन्याय, अत्याचार आणि सामाजिक प्रश्नांवर कायदेशीर पातळीवर आवाज उठवण्याचा सल्ला देत संघटनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत न्याय पोहोचविण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. साठे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.