वर्धेत तीन दिवसात शंभरहून अधिक अवैध बांधकामे हटवली

    दिनांक :21-May-2026
Total Views |
पालिका प्रशासनाची कारवाई
 
वर्धा, 
Illegal structures removed शहरात गत तीन दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. बजाज चौकातून सुरू झालेली ही कारवाई बॅचलर रोड होत पावडे चौकापर्यंत पोहोचली. या मोहिमेत मुख्य रस्ते आणि बाजारपेठ मधील अवैध अतिक्रमणे हटवली जात आहे. शहरातून जाणार्‍या मुख्य मार्गावर, बॅचलर रोड आणि सेवाग्राम मार्गावर दीर्घकाळापासून वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत होता.
 
 
atikraman
 
Illegal structures removed  रस्त्याच्या कडेला लहान व्यावसायिकांनी उभारलेल्या तात्पुरत्या दुकानांच्या शेड्स हळूहळू रस्त्यापर्यंत वाढल्या होत्या. अनेक दुकानदारांनी आपला मालही रस्त्यावर ठेवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांकडून सातत्याने येणार्‍या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. १८ मेपासून सुरू झालेल्या या मोहिमेपूर्वी अतिक्रमणधारकांना नोटीस बजावण्यात आले. त्यामुळे काहींनी कारवाईपूर्वीच स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. मात्र, ज्यांनी निर्देशांचे पालन केले नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.