इंद्रनील नाईक यांचा कडक इशारा
पुसद,
Indraneel Naik राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयाला आकस्मिक भेट देऊन सुविधा व दैनंदिन कामकाजाची बारकाईने पाहणी केली. शेतकèयांच्या सुविधांबाबत हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, असा कडक इशारा बाजार समिती व्यवस्थापन आणि प्रशासनाला त्यांनी यावेळी दिला. राजकारणासाठी बाजार समितीचे राजकीय भांडवल करणाèयांनी समितीची नाहक बदनामी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
बाजार समिती माध्यमातून शेतकèयांना स्वच्छ पिण्याचे पाणी, शेतमालाची सुरक्षा, त्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, वेळेवर चुकारा व योग्य पद्धतीने लिलाव, काटेकोर वजन या संदर्भात पुसद बाजार समितीच्या व्यवस्थापन समितीने दक्ष राहून शेतकèयांना न्याय देणे गरजेचे असल्याचे सांगत, याबाबत हलगर्जीपणा केल्यास कठोर कारवाईला समोर जावे लागणार असल्याचा कडक इशारा नाईक यांनी यावेळी दिला.
Indraneel Naik पुसद बाजार समितीच्या माध्यमातून खुला आणि पारदर्शक लिलाव केल्या जात असून शेतकèयांना अधिक भाव मिळत असल्यामुळे पुसद बाजार समितीमध्ये नांदेड हिंगोली माहूर किनवट हदगाव कळमनुरी महागाव उमरखेड अशा विविध ठिकाणांवरून दररोज किमान 3.5 हजार क्विंटलपेक्षा अधिक शेतमाल पुसद बाजार समितीमध्ये रोज येतो. हीच समितीच्या कार्यपद्धतीची पावती असल्याचे व्यवस्थापन समितीने नाईक यांच्यासमोर बोलून दाखविली. पुसद बाजार समितीच्या या चांगल्या कार्यपद्धतीबद्दल इंद्रनील नाईक यांनी व्यवस्थापन समितीचे कौतुक करीत शेतकèयांची लूट होणार नाही, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची ताकीद व्यवस्थापन समितीला दिली.
शेती आणि शेतकरी हाच आमच्या समाजकारणाचा केंद्रबिंदू असल्यामुळे त्यांना न्यायप्रविष्ट व पारदर्शक सुविधा बाजार समितीच्या माध्यमातून तत्परतेने पुरविणे ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी असल्याची जाणीव बाजार समितीच्या प्रत्येक कर्मचाèयाने ठेवावी अन्यथा कुणाचीही गय करण्यात येणार नाही असा स्पष्ट इशारा याप्रसंगी राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिला. याप्रसंगी पुसद नगर परिषद अध्यक्ष मोहिनी नाईक, पुसद बाजार समितीचे सभापती शेख कौसर, उपसभापती अभय राठोड, सचिव मगर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.