नागपूर,
Job Fair तरुणांना जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या ’रोजगार मेळावा’ अभियानाचा एक भाग म्हणून, शनिवार, २३ मे रोजी नागपूरसह देशभरातील ४७ शहरांमध्ये एकाच वेळी मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे.
Job Fair दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर विभागाचा हा मेळावा ऑडिटोरियम, पोलीस लाईन टाकळी फीडर रोड, राजनगर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्ते सकाळी ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले जाणार आहे. या रोजगार मेळाव्यात, रेल्वे, संरक्षण आणि आरोग्य यांसारख्या विविध केंद्रीय विभागांमध्ये निवड झालेल्या एकूण ३१५ उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जातील. यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी एक भक्कम पाया तर मिळेलच, पण हा उपक्रम संपूर्ण क्षेत्रासाठी एक प्रेरणास्थान म्हणूनही काम करेल. या प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, प्रमुख म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जातील.